महाराष्ट्रातील महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब‘ आहे आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते हे उद्धव ठाकरे आहेत, अशी बोचरी टीका अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही आता अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. समाज माध्यमावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

आज अमित शहा यांनी पुण्यात येऊन जी मुक्ताफळ उधळली आहेत, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, अमित शाह यांना आजही महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं लागतं. त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरूवात करता येत नाही आणि भाषण संपवता ही येत नाही, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं. तसेच अमित शाह यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे, त्यानुसार महाराष्ट्रात भाजपापुढे उद्धव ठाकरे हेच सर्वात मोठं आव्हान आहे, हे स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

हेही वाचा – उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते… अमित शाहांची टीका

पुढे बोलताना त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली. अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात अत्यंत थिल्लर भाषा यांनी वापरली आहे. हे दुर्दैवी आहे. संसदेत भाजपाचे खासदार रमेश भिदूडी यांनी जी सवंग भाषा वापरली होती. त्यापेक्षाही खालचा स्तर अमित शहा यांनी आज गाठला आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके, अमित शाहांची बोचरी टीका…

अंबादास दानवेंचंही अमित शाह यांच्यावर टीकास्र

सुषमा अंधारे यांच्याशिवाय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही अमित शाह यांना लक्ष्य केलं. ज्यांनी जिना यांच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिली आणि ज्यांनी निमंत्रण नसताना नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला जात त्यांना केक भरवला ते कोणत्या फॅन क्लबचे सदस्य आहेत? याचं उत्तर आधी अमित शाह यांनी द्यावं, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. खरं तर असे शाह महाराष्ट्रावर चालून येण्याच्या पहिली घटना नाही. आदीलशाह, कुतूबशाह त्यापैकीच एक शाह हे अमित शाह आहेत. पण अशा शाह यांना परत कसं पाठवायाचं, हे महाष्ट्राच्या मातीला चांगलं माहिती आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader