दसऱ्यानिमित्त आज, मंगळवारी राज्यात मोठे मेळावे होत आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मुंबईतील मेळाव्यांमध्ये आजी-माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे होतील. सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. पाठोपाठ भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांचा बीडमधील पारंपरिक मेळावा सुरू असून यंदा प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही जाहीर सभा होत आहे. यानिमित्त राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून अवघ्या सहा-सात महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंगही यानिमित्ताने फुंकलं जाणार आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. पक्ष फूटल्यानंतरचा दोन्ही गटांचा हा दुसराच मेळावा आहे. दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, मुंबईतला दसरा मेळावा एकच असतो, बाकी इतरांच्या इव्हेंटचं मला काही माहिती नाही. शिवसैनिकांनी मेळाव्याला यावं यासाठी आम्ही महाराष्ट्रभर गाड्या पाठवलेल्या नाहीत. तसेच आमदार-खासदारांवर गर्दी जमवण्याची जबाबदारीदेखील दिलेली.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Worli Constituency Assembly Election 2024 Worli Chairs That Will Give A Unique Challenge To Aditya Thackeray Mumbai news
वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना अनोखे आव्हान देणाऱ्या खुर्च्या; शिवसेनेची (एकनाथ शिंदे) प्रचाराची अनोखी शक्कल
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Priya Sarvankar on Amit Thackeray
‘त्या’ युवराजाला जनता कंटाळली, आता हा ‘राज’पुत्र काय करणार?, सदा सरवणकरांच्या मुलीची दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
wani vidhan sabha constituency BJP kunbi statement bag inspection
वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

सुषमा अंधारे म्हणाल्या, “यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. कारण, मागच्या वर्षी एक खुर्ची रिकामी होती, ती खुर्ची संजय राऊतांच्या उपस्थितीने यंदा पुन्हा एकदा चैतन्यमय होणार आहे. आमच्यासाठी आजचा दसरा मेळावा विशेष महत्त्वाचा आहे.” सुषमा अंधारे एबीपी माझाशी बोलत होत्या. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगात होते. त्यामुळे, ते दसरा मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत.

दरम्यान, दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गटाने जारी केलेल्या टीझरवरही सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहोत. त्यांच्या टीझरमध्ये एकलव्य, एकनाथ, एक विचार, एक पक्ष असं सगळं आहे. परंतु, त्यात कुठेही एकनिष्ठ शब्द नाही. त्यांच्या टिझरमधून एकनिष्ट हा शब्द गायब आहे. ज्यांना टीझरमध्येसुद्धा एकनिष्ठ शब्द लिहिण्याची हिंमत झाली नाही, त्यांनी एकनिष्ठतेच्या बाता मारू नयेत. असो! आजचा दिवस चागला आहे. त्यामुळे त्यांनाही (शिंदे गटाला) दसरा मेळाव्याच्या शुभेच्छा.