बॉलिवूड कलाकार मोठ्या उत्साहात नाताळ साजरा करतात. बॉलिवूड कलाकारांनी यंदादेखील कुटुंब आणि मित्र परिवाराबरोबर नाताळ सण साजरा केला आणि त्यांचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी २५ डिसेंबर रोजी नाताळनिमित्त खास समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान कार्यालयाने अनेक ख्रिस्त धर्मीय कलाकार, नेते, अधिकारी आणि इतरांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियादेखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. डिनोने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोटो काढून ते समाजमाध्यमांवर शेअर केले. परंतु, या फोटोवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांना टोला लगावला आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी डिनो मोरियावर अनेकदा टीक केली आहे. तसेच डिनो मोरियाचा उल्लेख करून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपही केले होते. नितेश राणे यांनी डिनो मोरियाला ‘मुंबई महापालिकेचा सचिन वाझे’ म्हटलं होतं. परंतु, याच डिनो मोरियाने यंदा पंतप्रधानांबरोबर नाताळ साजरा केला. ठाकरे गटाने डिनो मोरिया आणि नरेंद्र मोदींचे गप्पा मारतानाचे काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत नितेश राणे यांना टोला लगावला आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
The winter session of Legislature starts December 16 in Nagpur as per Agreement
नागपुरात दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याबाबत यशवंतराव चव्हाणांचीभूमिका काय होती ?
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी डिनो मोरिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच अंधारे यांनी म्हटलं आहे की, मला हे अजिबात आवडलेलं नाही. दर वेळेला आमच्या नितू बाळाला असं तोंडघशी पाडायचं… याचा अर्थ काय? याच डिनो मोरियावरून नितू आणि समस्त भाजपाच्या बार्किंग ब्रिगेडने किती उर बडवून घेतला होता. अंधारे यांनी पुढे ‘नकली हिंदू’ असा हॅशटॅगही वापरला आहे.

हे ही वाचा >> बच्चू कडूंना महाविकास आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करणार का? शरद पवार म्हणाले…

नितेश राणे यांनी आरोप केला होता की, डिनो मोरिया सर्वांना सांगत फिरतो की, तो मुंबई महापालिकेशी संबंधित कोणतंही काम चुकटीसरशी करू शकतो. डिनो मोरियावर अलिकडेच अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली होती. या कारवाईनंतर नितेश राणे डिनो मोरियाविरोधात आक्रमक झाले होते. राणे म्हणाले होते मोरिया प्रकरणाची सखोल चौकशी केली तर पेंग्विन बाहेर येतील. तसेच राणे यांनी डिनो मोरियाला ;बीएमसीचा सचिन वाझे’ म्हटलं होतं.

Story img Loader