पंतप्रधानपदी अटल बिहारी वाजपेयी असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मी परराष्ट्र मंत्री होतो. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी कोणत्याही देशाचा दौरा असल्यास मला घेऊन जात किंवा चर्चा करत होते. मात्र मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्र्यांना काही विचारले जात नाही. त्या (सुषमा स्वराज) केवळ ट्विटर मंत्री राहिल्या आहेत, अशा शब्दात यशवंत सिन्हा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत बुधवारी यशवंत सिन्हा यांनी मार्गदर्शन केले. यशवंत सिन्हा यांनी मोदींच्या एकाधिकारशाहीवर टीका केली. ते म्हणाले, आजवरच्या राजकीय प्रवासात कोणतेही सरकार निर्णय घेताना, आपल्या मंत्र्यांना किंवा वरिष्ठांना विश्वासात घेऊन काम करायचे, मात्र या सरकारचे प्रत्येक निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जातात. अन्य कोणत्याही मंत्र्याच्या कार्यालयातून निर्णय घेतले जात नाही. ज्यावेळी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा त्याची कल्पना अर्थमंत्र्यांनादेखील नव्हती. यातून या सरकारचा कारभार लक्षात येतो, असे त्यांनी नमूद केले. नोटांबदीमुळे काहीच साध्य झाले नाही. याऊलट बेरोजगारी वाढली, अशी टीका त्यांनी केली.

यशवंत सिन्हा यांनी वाजपेयी आणि मोदींमधील फरकही सांगितला. पंतप्रधानपदी अटल बिहारी वाजपेयी असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मी परराष्ट्र मंत्री होतो. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी कोणत्याही देशाचा दौरा असल्यास मला घेऊन जात किंवा चर्चा करीत होते. मात्र आताच्या परराष्ट्र मंत्र्यांना काही विचारले जात नाही. त्या केवळ ट्विटर मंत्री राहिल्या आहेत, अशा शब्दात मोदी आणि स्वराज यांच्यावर टीका केली.
पाच राज्याच्या निवडणुकीनंतर मोदींविरोधात भाजपात कोण बोलेल का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, भाजपात सर्वजण मोदींना घाबरून आहेत. त्यामुळे कोणी बोलणार नाही. सरकारच्या दबावामुळे उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. यातून मोदींचा कारभारात किती हस्तक्षेप आहे. हे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास मोदी आणि शहा कुठे असतील?, गडकरींना नेतृत्वाची संधी मिळेल का?, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आले. मोदीविरोधी पक्षनेते असतील आणि शहा अध्यक्ष राहतील. मात्र हे दोघे असल्याने नितीन गडकरी यांना संधी मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले.