सांगली : मनुष्यवधाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीने कारागृहासमोरच पोलीसांच्या हाताला हिसडा देउन बेडीसह पलायन करण्याची घटना सांगली येथे शनिवारी मध्यरात्री घडली. संशयिताला पकडण्यासाठी पोलीसांनी नाकाबंदी करूनही तो सायंकाळपर्यंत हाती लागला नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लक्ष्मण आण्णा चौगुले (रा. विटा) हा २०१८ मध्ये घडलेल्या खून प्रकरणातील संशयित होता. तो न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या प्रकृर्ती ठीक नसल्याने वैद्यकीय उपचारासाठी पुण्यातील ससून रूग्णालयात नेण्यात आले होते. रूग्णालयात उपचार केल्यानंतर परत त्याला सांगलीतील कारागृहात दाखल करण्यासाठी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास आणण्यात आले. या दरम्यान, त्याला बेडीही घालण्यात आलेली होती. मात्र, कारागृहाचा दरवाजा उघडेपर्यंत त्यांने पोलीसांच्या हाताला हिसडा देउन बेडीसह अंधाराचा फायदा घेत पलायन केले.

आणखी वाचा-६ वर्षांचा प्रेमसंबंध, मात्र लग्नाच्या वेळी आडवी आली जात, प्रियकराविरोधात बलात्कार आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

या प्रकारामुळे पोलीसांची चांगलीच धावपळ उडाली. रात्रीच त्याला पकडण्यासाठी पोलीसांनी नाकाबंदी केली होती. मात्र, तो सापडला नाही. त्याला पकडण्यासाठी पोलीसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. सायंकाळपर्यंत त्याचा मागमूस लागलेला नव्हता.