नंदुरबार : बलात्कार करून मुलीची हत्या होऊनही पोलिसांनी आत्महत्येची नोंद केल्याचा आरोप करीत तिच्या वडिलांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो ४३ दिवसांपासून मिठाच्या खड्डय़ात पुरून ठेवला आहे. आपल्या मुलीच्या मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन केले जाईल आणि या गुन्ह्याचा छडा लागेल, या आशेवर ते आहेत. पीडित कुटुंब आदिवासी असून, हा प्रकार आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याच जिल्ह्यात घडला आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील ही पीडित विवाहिता माहेरी असताना १ ऑगस्टला ही घटना घडली. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार जवळच्याच वावी गावातील तिच्या परिचयाच्या रणजित ठाकरे आणि अन्य एकाने तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून गावाबाहेर नेले. काही वेळाने पीडितेने नातलगांशी मोबाइलवर संपर्क साधून ओढवलेली परिस्थिती कथन केली. रणजितसह चार जण आपल्यावर अत्याचार करीत

car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
राणीच्या बागेतील हत्तींचा अधिवास पोरका
Leopard attacks in Sangamner, Leopard attacks Death youth, Leopard Sangamner,
अहमदनगर : संगमनेरमध्ये बिबट्याने युवकाच्या शरीराचे तोडले लचके, युवक ठार
Two unidentified assailants beat up senior BJP worker in Parnaka area in west of Kalyan
कल्याणमध्ये भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी भाजपचा आंदोलनाचा इशारा
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
karnatak accident
कर्नाटकातील अपघातात जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा ठार

असून ते ठार मारतील, अशी भीती तिने फोनवर व्यक्त केली. त्यानंतर काही वेळेतच वावी येथील आंब्याच्या झाडाला तिने गळफास घेतल्याचे तिच्या कुटुंबियांना कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह झाडावरून उतरवून पुरावा नष्ट करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

‘‘पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार करूनही पोलिसांनी त्या दिशेने तपास केला नाही. पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर आजपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार केलेले नाहीत. पुन्हा शवविच्छेदन होईल, या आशेवर तिचे पार्थिव मिठाच्या खड्डय़ात ठेवले आहे’’, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले. 

मोबाईल ध्वनिफित

शवविच्छेदनावेळी पोलिसांनी आत्महत्येच्या अनुषंगाने विच्छेदन करण्यास सांगितले होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचे पोलिसांनी सांगितले नाही, त्यामुळे तसे विच्छेदन झाले नसल्याची धडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची ध्वनिफीत कुटुंबियांकडून सादर करण्यात आली आहे. पीडितेचे मृत्यूपूर्वीचे मोबाईल संभाषण, आपल्यावर अत्याचार केले जात असल्याबाबत तिने व्यक्त केलेली अगतिकता या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आजही पीडितेचे कुटुंब न्याय मिळेल, या आशेवर मिठाच्या खड्डय़ात ठेवलेल्या पार्थिवाजवळ आस लावून बसले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत रणजित ठाकरे (१९), सुनील उर्फ हाना वळवी (२१), अमर उर्फ गोटू वळवी (१८) या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, अशी माहिती शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी दिली. तपासातून जे तथ्य समोर आले, त्यानुसार अतिरिक्त कलमांचा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करण्याची सूचना अधीक्षकांनी धडगाव पोलीस ठाण्यास केली. त्यानुसार पोलिसांनी तालुका दंडाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

न्यायासाठी.. 

पीडितेचा मृतदेह मिठाच्या खड्डय़ात ठेवून तिचे वडील आणि ग्रामस्थ न्यायासाठी धडगाव पोलीस ठाणे ते पोलीस अधिक्षक कार्यालय अशी पायपीट करीत आहेत. सर्वाना भेटून त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. सामाजिक कार्यकर्त्यां परिणिती पोंक्षे यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचवले गेल्याचे सांगण्यात आले. आता सुमारे ४० दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करण्यासाठी परवानगी मागितली आहे.  

माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. बलात्कारानंतर तिचा खून करून तिला झाडावर लटकविण्यात आले. धडगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पुन्हा शवविच्छेदन व्हावे, यासाठी मी मृतदेह मिठाच्या खड्डय़ात ठेवला आहे. जोपर्यंत पुन्हा शवविच्छेदन केले जात नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही.  – पीडितेचे वडील

शवविच्छेदन अहवालानुसार पोलिसांनी प्रथम आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. तपासातून तथ्य पुढे आल्यानंतर त्यात अनेक अतिरिक्त कलमांचा समावेश करण्यात आला. आता मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन केले जाणार आहे. त्याबाबत तालुका दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला आहे.

श्रीकांत घुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा

Story img Loader