उसाला एफआरपीनुसार पहिला हप्ता मिळावा आणि ‘एफआरपी’नुसार देयके न देणाऱ्या साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी पलूस तालुक्यातील वसगडे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत सुमारे तीन तास वाहतूक रोखली. रास्ता रोको आंदोलनामुळे माजी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना प्रवासाचा मार्ग बदलावा लागला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी सकाळी वसगडे येथील येरळा नदीच्या पुलावर अचानक रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या पलूस सांगली मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती. आंदोलक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून टाकले होते. अचानक आंदोलन सुरू झाल्याने पोलीस खात्याची धावपळ उडाली.
उसाला एफआरपीनुसार दर मिळावा आणि या दरानुसार पहिला हप्ता देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संदीप राजोबा यांनी सांगितले.
दरम्यान, या आंदोलनाच्या वेळी आ. डॉ. पतंगराव कदम हे पलूसहून सांगलीकडे येत होते. रस्त्यावर आंदोलन सुरू असल्याने त्यांना आपला मार्ग बदलावा लागला. ते परत पाचवा मलला जाऊन भिलवडी माग्रे सांगलीकडे रवाना झाले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा