सांगली : राज्यातील सहा लोकसभा मतदार संघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक स्वबळावर लढविणार असून कोणत्याही पक्षाशी आघाडी करायचाच नाही असा निर्णय संघटनेने घेतला असल्याचे माजी खा. राजू शेट्टी यांनी गुरूवारी सांगलीत पत्रकार बैठकीत सांगितले. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवनमध्ये २ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या नांगरट साहित्य संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार बैठक आयोजित करण्यात आले होती. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे उपस्थित होते.

यावेळी श्री. शेट्टी यांनी सांगितले, आपण स्वत: हातकणंगले मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असून बुलढाण्यातून रविकांत तुपकर हे मैदानात उतरणार आहेत. याशिवाय सांगली, कोल्हापूर, माढा आणि परभणी या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार उभे करणार आहे. आता यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाशी आघाडी करायची नाही निर्णयसंघटनेने घेतला असून यामुळे या सहा जागा स्वबळावर लढविणार आहे.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

हेही वाचा >>> संविधान, लोकशाहीवर दुटप्पी विरोधकांचा विश्वास नाही : देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

या मतदार संघामध्ये स्वाभिमानीची ताकद असून लोकसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवार निश्‍चित करीत असताना कार्यकर्त्याचा बळी जाणार नाही याची दक्षताही घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत काही राजकीय पक्षांशी आघाडी करून  पाहिली, आघाडीत सहभागी होउन पाहिले, मात्र, शेती आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत असे दिसून आले. यामुळेच आपण चळवळ जिवंत ठेवून राजकारण करण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.

हेही वाचा >>> लग्नाचा बाजार मांडणाऱ्या दोघांना अटक

व्यवस्थेमध्ये सहभागी होउन प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी निवडणुका लढवाव्याच लागतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना ईडीने बजावलेल्या नोटीसबाबत विचारले असता श्री. शेट्टी म्हणाले, चौकशी करण्यास काहीच हरकत नाही. मात्र, केवळ विरोधकांची चौकशी हे बरोबर नाही. करायची झाल्यास माझ्यासह सर्वांचीच चौकशी करायला हवी. केवळ राजकीय विरोधापोटी सरकारी यंत्रणाचा केला जाणारा वापर गैर आहे.

Story img Loader