महापालिका निवडणुकीत िरगणात उतरलेल्या भाजप-ताराराणी आघाडीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे, याची घोषणा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. आरपीआयच्या नेत्यांशीही आघाडीत सहभागाबाबत चर्चा सुरू असून तेत्या आठ दिवसात त्याचा निर्णय होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीबरोबर नसíगक युती झाली. महापालिका निवडणुकीतही स्वाभिमानीला बरोबर घेण्यासंदर्भात खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी पािठबा दिला. आरपीआयला आघाडीत घेण्याबाबत रामदास आठवले यांच्याशी चर्चा सुरू असून लवकरच निर्णय जाहीर करू.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, महापालिकेत सुरू असलेली ढपला संस्कृती बंद करण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय खासदार राजू शेट्टी यांनी घेतला आहे. उपनगरामध्ये शेतकरी संघटनेची ताकद आहे. या ठिकाणी आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. संघटनेला किमान चार ते पाच जागा मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी आमदार अमल महाडिक, भाजपचे शहराध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, सुहास लटोरे, संजय स्वामी, सुनील मोदी, नगरसेवक आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही सहभाग
महापालिका निवडणुकीत िरगणात उतरलेल्या भाजप-ताराराणी आघाडीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे, याची घोषणा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
First published on: 10-08-2015 at 02:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimani shetkari sanghatana participate in corporation election