लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न पोलीसांनी रोखला. यावेळी कार्यकर्ते व पोलीसांमध्ये झटापट झाली.

सांगली जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सांगतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावर काटाबंद आंदोलनासाठी एकत्र आले आहेत . कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करत कारखान्याच्या आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र पोलिसांनी या आंदोलकांना गेटवरच थांबवले,त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये झटापटीचा प्रकार देखील घडला आहे.

आणखी वाचा-राज्यासह देशातील काही भागांत आज पावसाची शक्यता

या ठिकाणी राजू शेट्टीचे नेतृत्वाखाली आता काटाबंदी आंदोलन करण्यात येणार आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील असण्यात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimani shetkari sanghatana strikes on vasantdada factory for sugarcane price mrj