Swami Govind Dev Giri on Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती तर सूरतेवर स्वारी केली होती, आपल्या बापाला आपण लुटारू कसे काय म्हणू शकतो? असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यावर जोरदार आक्षेप घेत, ऐतिहासिक दाखले देण्याची स्पर्धा सुरू झाली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवरायांनी खंडणी मागितली होती, असे विधान केले. यावर वाद-प्रतिवाद सुरू असतानाच आता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या सूरत लुटीबाबत वेगळेच विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराजांनी ईडीप्रमाणेच सक्तीची वसुली केली

“संपूर्ण राज्य हिंदूंचे आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराज कार्य करत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान जेव्हा महाराजांना आर्थिक चणचण भासत असे आणि अशावेळी कुठलाही उपाय दिसत नसे. तेव्हा आज ज्याप्रकारे ईडी सक्तीची वसुली करते. त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीची वसुली केली. हिंदवी स्वराज्यासाठी जो कर भरायला हवा होता, त्याची महाराजांनी सक्तीची वसुली केली”, असे मत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले आहे.

हे वाचा >> Chhatrapati Shivaji Maharaj looted Surat: छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती? राष्ट्रवादी – भाजपामध्ये ‘खंडणी’ शब्दावरून जुंपली

आज गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळाला भेट दिली असता एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे आता भाजपाकडून त्यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. २२ जानेवारी रोजी जेव्हा अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्या सोहळ्यात बोलत असताना गोविंददेव गिरी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा श्रीमान योगी असा उल्लेख केला होता.

स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले होते, “अमूक एक परिवर्तन आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पावे लागते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभले. आज राम मंदिरात केवळ एका मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नाही, तर या देशाची अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आहे. ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हे स्वप्न पूर्ण होत आहे.” हे सांगताना गोविंददेव गिरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देऊन पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते.

आणखी वाचा >> पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; गोविंदगिरी महाराज म्हणाले, “श्रीमंत योगी…”

छत्रपती शिवाजी महाराज लुटारू नव्हते – फडणवीस

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली हे म्हणणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेवर दोनदा स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुट म्हणतात. अब्दाली, तैमूर यांनी जे केले त्याला लूट म्हणतात. महाराजांनी तिथल्या सामान्य माणसांना हात तरी लावला का? शिव इतिहासकारांनी माध्यमांना सांगितलं की महाराजांनी पत्र दिलं होतं मुघलांचा खजिना आहे, तुम्ही तीन वर्षे युद्ध चालवलं, त्यासाठी इतका खर्च आला. तुम्ही हा खर्च द्या अन्यथा मी स्वारी करेन. शिवरायांनी एक प्रकारे त्यांना नोटीसच पाठवली होती. खजिना वसूल केला, त्यानंतर महाराजांनी पावती दिली. याला लूट म्हणतात का? आपल्या बापाला लुटारू म्हणणारे हे कोण लोक आहेत? महाराजांनी कधीही सूरत लुटली नव्हती.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : फडणवीसांकडून राजमाता जिजाऊंची कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी तुलना? शरद पवार गटाने बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत सुनावलं

जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली म्हणजे ते लुटारू होत नाहीत. नादीरशाहने सरसकट लूट केली होती. तसे महाराजांनी केले नाही. महाराजांनी यादी तयार केली. पारेख कुटुंबात कुणाचा तरी मृत्यू झाला होता, महाराजांनी त्यावर फुली मारली. तिथे जाऊ नका म्हणून सैनिकांना सांगितले. त्यांनी आधी सूरतला नोटीस पाठवून खंडणी मागितली होती. त्यानंतर सूरत लुटण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami govind dev giri maharaj comment on chhatrapati shivaji maharaj looted surat historical records kvg