Swara Bhaskar Blame EVM For Husband Defeat : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी आज (२३ नोव्हेंबर) रोजी होत आहे. यादरम्यान अभिनेत्री स्वरा भास्करने पतीच्या पराभवासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM)ला दोषी ठरवले आहे. स्वरा भास्करचा पती फहाद अहमद हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार म्हणून अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवर पोस्ट करत इव्हीएमबद्दल गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.

अभिनेत्री स्वरा भास्कर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाली की, “अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्र्वादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार फहाद अहमद यांनी स्थिर आघाडी घेतली… १७, १८, १९ व्या फेरीनंतर अचानक ९९ टक्के बॅटरी चार्ज असलेल्या EVM उघडण्यात आल्या आणि भाजपा समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवाराने आघाडी घेतली”.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Allu Arjun children whisked away after attack on home
Video: हल्ला झाल्यानंतर पत्नी, मुलांना घेऊन अल्लू अर्जुनने सोडलं घर; त्याचे वडील म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते…”
Mumbai 10 lakh looted marathi news
मुंबई : शस्त्रांचा धाक दाखवून १० लाख रुपये लूटले
Absconding young woman arrested , woman arrested fraud case, woman fraud with builder,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड
badshah traffic violation allegation
बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”
Dadar police registered case against owner Sachin Kothekar after workers death in grinder
शर्टाने केला घात ग्राईंडरमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

“संपूर्ण दिवसभर मतदान झालेल्या मशीनची बॅटरी ९९ टक्के कशी चार्ज असू शकते? सर्वच ९९ टक्के चार्ज बॅटऱ्या भाजपा आणि मित्रपक्षांना मते का देतात?”, असे प्रश्न स्वरा भास्कर यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

अत्यंत अटीतटीच्या लढतीत फहाद अहमद यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सना मलिक यांच्याविरोधात आघाडी मिळाली होती. मात्र अखेरच्या फेरीत अहमद यांचा पराभव झाला. अद्याप अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला नसला तरी निवडणूक कलांनुसार सना मलिक या ३,३७८ मतांनी आघाडीवर होत्या.

हेही वाचा>> “आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडला…”, विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांच…

u

राज्यात महायुतीचा विजय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. महायुतीला विधानसभेच्या २२० हून अधिक जागांवर विजय मिळाला आहे. यासोबतच महायुतीने बहुमताचा आकडा देखील पार केला आहे.

बहुमताचा आकडा गाठल्याने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. यानंतर राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. जागोजागी आतषबाजी आणि मिठाई वाटली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार महायुतीचे उमेदवार २२४ जागांवर आघाडीवर आहेत. ज्यामध्ये भाजपा १३० जागा, शिवसेना (एकनाथ शिंदे) – ५४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४० जागांवर आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ५२ उमेदवार आघाडीवर आहेत, ज्यापैकी काँग्रेस – १९, शिवसेना (ठाकरे) – २० आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष १३ जागांवर आघाडीवर आहे

Story img Loader