राज्यात स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला असतानाच उस्मानाबादेत धक्कादायक बाब उघडकीस झाली आहे. संशयित स्वाइन फ्लू रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवू नका असे सांगत फक्त अतिदक्षता विभागात भरती असलेल्या रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने पाठवावेत, असा अजब लेखी आदेश पुणे येथील एनआयव्ही या प्रयोगशाळेने काढला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील संशयित स्वाइन फ्लू रुग्णांच्या लाळेचे नमुने जिल्हा शासकीय रुग्णालयातून डॉक्टरांनी तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. पुणे येथील एनआयव्ही या प्रयोगशाळेने जिल्ह्यातील सहा रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने परत पाठविले आहेत. फक्त अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांचेच स्वॅब नमुने पाठवावेत, असा आदेश प्रयोगशाळेने काढला आहे. पुणे येथील एनआयव्ही विभागाचे डॉ. एम. एस. चंदा यांनी हा आदेश काढत प्रशासन स्वाइन फ्लूबाबत किती गंभीर आहे? हेच दाखवून दिले आहे.
पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेने उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सहा संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने परत पाठविले आहेत. अनसूया नामदेव मचाले, पुष्पा बाबुराव येड्डे, प्रणाली सुहास सोनवणे, बाबुराव भगवान हेडगे, लक्ष्मी बालाजी पवार आणि सबाई िलबा राठोड या संशयित रुग्णांवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांचे स्वॅब नमुने पुण्यातील प्रयोगशाळेने तपासणी न करताच परत पाठविले आहेत.
मात्र, त्यामुळेच सरकार संशयित स्वाइन फ्लू रुग्णांची स्थिती गंभीर होईपर्यंत वाट पाहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे पालकमंत्री असलेल्या उस्मानाबादेत हा प्रकार घडल्याने आरोग्य विभागावर जिल्ह्य़ात टीका होत आहे. जिल्ह्यात १६ संशयित स्वाइन फ्लू रुग्ण आढळले. पकी दोघांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले, तर िहगळजवाडी येथील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे