महाराष्ट्रातील पालघर येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका टोळक्याने तरुणावर भररस्त्यात तलवारीने वार केले आहेत. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वळीव पोलीस ठाण्यात तीन अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना पालघर येथील नाईकपाडा परिसरात घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- हृदयद्रावक: फिफा विश्वचषकाचा आनंद क्षणात विरला, मुंबईत पाचव्या मजल्यावरून पडून चिमुकल्याचा अंत

संबंधित व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, आरोपींनी जखमी तरुणाच्या वाहनाला धडक दिली आणि तलवारीने चालकावर हल्ला केला. यावेळी एका आरोपीनं जखमी तरुणाला पकडलं तर अन्य आरोपीनं त्याच्यावर तलवारीने वार केले. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. एचएस दादू असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- Flashback 2022 : देशवासीयांना हादरवणारी २०२२ मधील अमानुष हत्याकांड ; आरोपींनी ओलांडली क्रौर्याची परिसीमा  

ही धक्कादायक घटना समोर येताच वळीव पोलिसांनी तीन अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. भरदिवसा तरुणावर तलवारीने हल्ला केल्यानं परिसरातील भीतीचं वातावरण निर्मा