अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘ढाल-तलवार’ या चिन्हाला शीख समाजाने विरोध दर्शवला आहे. हे चिन्ह शीख समाजाचं प्रतिक असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला आहे. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे माजी सदस्य रणजीत कामठेकर यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. हे चिन्ह शिंदे गटाला देऊ नये, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. ‘ढाल-तलवार’ हे धार्मिक चिन्ह आहे. या चिन्हाची पूजा पाचही तख्तांवर केली जाते, असे कामठेकर यांनी म्हटले आहे.

“उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला” टीकेवरुन सेनेचा राणेंना जशास तसा टोला; म्हणाले, “असं वाटत असेल तर…”

Ex PM Manmohan Singh Admitted To AIIMS In Delhi
Ex PM Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Eknath Shinde Help to Vinod Kambli
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळीला ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर, डॉक्टरांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

धार्मिक चिन्ह असल्यामुळे ज्याप्रमाणे ‘त्रिशुळ’ या चिन्हाला बाद ठरवण्यात आलं, त्याचप्रमाणे ‘ढाल-तलवार’ या चिन्हालाही रद्द करण्यात यावं, अशी मागणी कामठेकरांनी केली आहे. यासंदर्भात निर्णय न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला मिळालेली चिन्ह वादात सापडली आहेत. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षानं दावा केला आहे.

“अंधारात तीर मारणाऱ्या…” शालिनी ठाकरेंनी पेडणेकरांचा ‘कांदे बाई’ उल्लेख करत उडवली खिल्ली!

निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने ‘तळपता सूर्य’, ‘ढाल-तलवार’ आणि ‘पिंपळाचे झाड’ असे तीन पर्याय आयोगाला सादर केले होते. त्यापैकी ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. तर ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाला दिलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि ढाल आहे. ‘तळपता सूर्य’ या शिंदे गटाच्या पहिल्या पसंतीच्या चिन्हाला निवडणूक आयोगाने नाकारलं ua. उगवता सूर्य हे तामिळनाडूतील डीएमके आणि मिझोराम नॅशनल पक्षाचं चिन्ह आहे. त्यानंतर आता शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवारीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

Story img Loader