मंत्रालय, वन खात्यातील अधिकाऱ्यांच्या अट्टहासामुळे निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शक सूचनेनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पावसाळ्यात ताडोबा प्रकल्प तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यासंदर्भात पत्र पाठवले होते. परंतु मंत्रालय व वन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा करून क्षेत्र संचालकांना हा निर्णय बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे सोमवार, ९ जुलैपासून ताडोबा बफर क्षेत्र पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे.

नागपुरात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सुरू ठेवण्यात यावा, यासाठी अगदी सुरुवातीपासून दबावतंत्राचा वापर सुरू होता. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या जिल्हय़ातील असूनही मुंबई व नागपुरात कार्यरत मंत्रालय तथा वन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्याघ्र संरक्षणाकडे दुर्लक्ष करून रिसॉर्ट मालकांच्या हितासाठी हे सर्व घडून आणल्याचा आरोप आता होत आहे. ४३ किमी रस्ते पर्यटनासाठी सुरू होणार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील ४३ किलोमीटरचे रस्ते पर्यटनासाठी उद्या ९ जुलैपासून सुरू राहणार आहेत.  यामध्ये मोहुर्ली-आगरझरी ८ कि.मी. रस्ता पर्यटनासाठी सुरू राहणार आहे. मोहर्ली-देवाडा-अडेगाव हा ८.५०० किमी रस्ता, मोहुर्ली जुनोना ८.३०० किमी रस्ता, पळसगाव-मदनापूर ९.६३२ किमी रस्ता, खडसंगी-नवेगाव हा ९ किमी रस्ता सुरू राहणार आहे. या पाचपैकी चार रस्त्यांवर सकाळ व दुपारच्या फेरीत प्रत्येकी तीन वाहने, तर मोहर्ली-देवाडा-अडेगाव या रस्त्यावर सकाळ व दुपारच्या फेरीत प्रत्येकी सहा वाहने सोडली जातील. पळसगाव परिक्षेत्रातील कोलारा निसर्ग पर्यटन मार्गावर सुरुवातीचा मार्ग रहदारीयोग्य नसल्यामुळे व खडसंगी परिसरातील अलिझंजा निसर्ग पर्यटन मार्गाच्या सुरुवातीला मोठा नाला असल्यामुळे हा मार्ग पावसाळ्यात पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. या काळात ऑनलाइन बुकिंग बंद असून स्पॉट बुकिंग सुरू राहणार आहे. या कालावधीत मंगळवारी पर्यटन पूर्णपणे बंद राहणार आहे.

वन्यजीवप्रेमी संतप्त

या निर्णयाविरुद्ध समाजमाध्यमांवरही नाराजी व्यक्त केली जात आहे. सुरेश चोपणे यांनी वन्यजीव संरक्षण करण्याची ज्यांची घटनात्मक, कायदेशीर जबाबदारी आहे तेच जर संरक्षण करीत नसेल तर न्यायालयात दाद मागायला हवी असे मत नोंदवले आहे. माजी मानद वन्यजीवरक्षक उदय पटेल, कुंदन हाते, किशोर रिठे यांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे. ताडोबातील पर्यटनावरच बंदी आणावी, असेही अनेकांनी सुचवले आहे.

वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे ९ जुलैपासून ताडोबा बफर झोन पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. सुरुवातीचे काही दिवस पर्यटकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे लक्षात घेतले जाणार आहे. प्रतिसाद मिळाला नाही आणि पावसाळ्यात रस्ते अधिक खराब झाले तर पर्यटन पुन्हा बंद केले जाईल.

– मुकुल त्रिवेदी, प्रकल्प क्षेत्र संचालक