Tanaji Sawant : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबरला नागपूरमध्ये पार पडला. या मंत्रिमंडळात जुन्या नव्या अशा ३९ चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे. लवकरच खातेवाटप होईल असंही सांगण्यात आलं आहे. मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपामध्येही सुधीर मुनगंटीवार यांना स्थान देण्यात आलेलं नाही. यानंतर काहींची नाराजी समोर येते आहे. दरम्यान शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते तानाजी सावंत यांनी फेसबुकचा डीपी बदलला आहे.

तानाजी सावंत यांनी फेसबुकचा डीपी बदलला

शिवसेना पक्षातील पहिल्या फळीतील नेते असलेल्या आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार शिवसेना शिंदे गटाच्या ११ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यामध्ये, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र, शिवसेना (Shivsena) पक्षातील वरिष्ठ नेते व शिंदे सरकारमधील तीन माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. त्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनाही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे, तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) नाराज असून त्यांनी माध्यमांशी बोलण्याचंही टाळलं आहे. याबाबत, त्यांच्या कार्यालयाकडून माध्यमांसाठी पत्रकही जारी करण्यात आलं होतं. आता, तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो बदलल्याने चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी आपल्या प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढलं आहे.

Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ

हे पण वाचा- शिंदे यांची तारेवरची कसरत; भाजपचा आक्षेप असलेल्या तीन मंत्र्यांना वगळले

तानाजी सावंत यांनी कव्हर फोटो आणि डीपी दोन्ही बदललं

तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी त्यांच्या फेसबुकचा कव्हर फोटो आणि डीपी दोन्ही बदललं आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह असलेलं प्रोफाइल सावंत यांनी हटवलं आहे. त्याऐवजी, नवीन प्रोफाईल ठेवण्यात आलं असून या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये फक्त शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून येत आहे. तसेच, शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक उल्लेख असलेला बाळासाहेबांचा फोटो असल्याचं पाहण्यास मिळतं आहे. तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी फेसबुकचा डीपी आणि कव्हर फोटो दोन्ही बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

News About Tanaji Sawant
तानाजी सावंत यांनी डीपी आणि कव्हर फोटो दोन्ही बदललं. चर्चांना उधाण. (फोटो सौजन्य-तानाजी सावंत फेसबुक पेज)

हिवाळी अधिवेशनातही तानाजी सावंत यांची उपस्थिती नाही

दरम्यान हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून या अधिवेशनातही तानाजी सावंत आले नाहीत.राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यालाही तानाजी सावंत उपस्थित नव्हते. नागपूरमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्येच त्यांनी आपली बॅग पॅक केल्याची माहिती रविवारी समोर आली होती. तानाजी सावंत हे मंत्रि‍पदाचे दावेदार असतानाही त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत अशा चर्चा आहेत.

Story img Loader