रत्नागिरी :मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलचे डोके कापून बोट पेटवून दिली. देवगड समुद्रात ही घटना सोमवारी सकाळी घडल्याने खळबळ उडाली. कोस्टगार्ड च्या मदतीने बाकीच्या खलाशांना वाचविण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवगड येथील समुद्रात रत्नागिरी व आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर बोटी मच्छीमारीसाठी गेलेल्या होत्या. त्यामध्ये रत्नागिरी राजीवडा येथील रफिक फणसोपकर यांची बोट मच्छीमारीसाठी देवगड बंदरात गेलेली होती. मच्छीमारी करत असतानाच मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलाचे डोके कापले आणि ते डोकं बोटीवर ठेवून दिले. त्यानंतर संपूर्ण बोटीला आग लावली. या आगीमध्ये बोट मालकाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. यावेळी आजूबाजुला असलेल्या रत्नागिरीतील काही मच्छीमार बोटीवरील लोकांनी  जळणा-या बोटीवरच्या तीस ते पस्तीस लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर कोस्टगार्डला पाचारण करण्यात येऊन बोटीवरच्या इतर खलाशांचे प्राण वाचविण्यात आले. या घटनेतील मृत तांडेल हा जयगड येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तांडेलचे डोके कापणा-या खलाशाचे अद्याप नाव समजू शकले नाही. या घटनेमुळे रत्नागिरीतील मच्छिमार व्यवसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

pune Sinhagad Road police arrested innkeeper along with his accomplice who was walking around with pistol
कुख्यात लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोघे सराईत अटकेत, एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
man hit his father on head with an iron rod after arguments in amravati
अमरावती : रागातून उद्भवला वाद; मुलाने लोखंडी बत्त्याने वडिलांच्या डोक्यावर…
Mayuresh Wanjale
खडकवासला मतदारसंघातील समीकरणे बदलणार ?
College youth drowned Khamboli lake, Khamboli lake, Mulshi,
मुळशीतील खांबोली तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू
metal spoon in honey
धातूचा चमचा मधात ठेवणे विषारी ठरू शकते? तज्ज्ञ काय सांगतात…
The little one was being swept away by the waves of the sea the people came running to save him Shocking video viral
प्रत्येक वेळी लोक वाचवायला येत नाही! समुद्राच्या लाटेत वाहून जात होता चिमुकला…तेवढ्यात…; धक्कादायक Video Viral
Leopard Nate area, Ratnagiri, Leopard, loksatta news,
रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश