सांगली : निर्बंधमुक्त वातावरणामध्ये तासगावचा २४३ वा रथोत्सव गुरुवारी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रींची पंचधातूची मूर्ती असलेला रथ साधारण एक किलोमीटर अंतरावरील काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला निघाला. त्या वेळी गणेशभक्तांनी गुलाल, पेढय़ांची उधळण केली. या वेळी रथाचे सारथ्य मराठय़ांचे अखेरचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांचे वंशज राजेंद्र पटवर्धन यांनी केले. या रथोत्सवास दारूबंदी व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, खा. संजयकाका पाटील, राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in