Maharashtra Government Formation Oath Ceremony : राज्यात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. निर्वावाद बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री आणि इतर खात्यांबाबत अद्यापही अधिकृत माहिती आलेली नसली तरीही शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. दरम्यान, नागपुरातील एका चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण आलं आहे. गोपाळ बावनकुळे या चहाविक्रेत्याला देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आमंत्रण पाठवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या चहाविक्रेत्याच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीसांचा फोटोही लावला आहे. याबाबत टीव्ही ९ने गोपाळ बावनकुळे यांच्याशी संवाद साधला.

भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत फडणवीस यांची निवड होणे अपेक्षित आहे. या बैठकीनंतर भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडेल. त्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेसाठी दावा केला जाईल. राज्यपालांकडून मंत्रिमंडळ शपथविधी समारंभ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला असल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातली अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, या शपथविधीला नागपुरातील चहाविक्रेत्यालाही आमंत्रण मिळाले आहे.

seagulls Sindhudurg loksatta news
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागर किनारी सिगल पक्ष्यांचे आगमन
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
India-Canada Conflict United States reacts
India Canada Row: खलिस्तानी अतिरेक्यांच्या हत्येमागे अमित शाह? कॅनडाच्या आरोपाची अमेरिकेकडून दखल; म्हणाले, “चिंताजनक…”
Vijay Rupani on maharashtra Government Formation
Vijay Rupani : मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “एकनाथ शिंदेंना…”
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “सत्तेसाठी एक अख्खा पक्ष…”, शरद पोंक्षेंचं मनसेच्या व्यासपीठावरून सत्ताधारी आणि विरोधकांवर हल्लाबोल
hindus atacked in canada
हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडा प्रशासनाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली, “हाच तो”!
Markadwadi repoll
‘EVM विरुद्ध बॅलेट लढाई टळली’,भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट मते कशी गेली? मारकडवाडीतील फेरनिवडणूक रद्द

हेही वाचा >> Sanjay Raut : “एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यामागे दिल्लीतील महाशक्तीचा हात”, राऊतांच्या दाव्याने खळबळ; सत्ता स्थापनेचा तिढा वाढणार?

मला चहावाला म्हणून आमंत्रण

नागपुरातील चहाविक्रेते गोपाळ बावनकुळे म्हणाले, “५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीसाठी मला पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी पास पाठवला आहे. मी आवर्जुन उपस्थित राहणार आहे. चहावाला म्हणून मला आमंत्रण दिलंय. आम्ही त्यांना मेसेज करतो किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांची भेट घेतो तेव्हा ते आम्हाला मदत करतात.”