शारीरिक दुर्बलता ही मानसिक दुर्बलताही आणत असते, त्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना ज्युडो-कराटे शिकवले पाहिजेत. शालेय पातळीवर शारीरिक शिक्षण सर्वासाठी अनिवार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी येथे व्यक्त केले.
पत्रकारांशी संवाद साधताना माजी राष्ट्रपती म्हणाल्या की, दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत घृणास्पद अशी होती. सर्वाच्या मनावर त्याचा परिणाम झाला आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आज देशात मंथन सुरू झाले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कडक कायदे झाले पाहिजे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणीदेखील झाली पाहिजे. मुलींना ज्युडो-कराटे सारखे आत्मसंरक्षणाचे उपाय शिकवल्यास त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ शकेल, असे प्रतिपादन प्रतिभा पाटील यांनी केले.
आणखी वाचा