नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय शैक्षणिक प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चार शिक्षकांची निवड झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील पिंपळपाडा येथील जनता सेवा मंडळ संचालित माध्यमिक शाळेतील शिक्षक संजय तिवारी आणि मोहाडी येथील के. आर. टी. शाळेतील माधव पवार, तिरपुडे येथील मातोश्री शांताबाई विद्यालयाचे सुरेश अहिरराव, अजमेर सौंदाणे येथील जनता विद्यालयाचे शरद जाधव, यांची २० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय शैक्षणिक प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे. ‘भारत मे आये विदेशीयोंका इतिहास लेखन मे योगदान’ या विषयावरील प्रबंध सादर करुन चर्चेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती, साहित्यिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक स्रोत व त्यांचा समन्वय, या विषयावर ते राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांची निवड
नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय शैक्षणिक प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चार शिक्षकांची निवड झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील पिंपळपाडा येथील जनता सेवा मंडळ संचालित माध्यमिक शाळेतील
First published on: 20-11-2012 at 06:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher selected for national training