शिक्षक दिनाचे औचित्य साधून उद्या (५ सप्टेंबर) होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सक्ती नसल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून गुरुवारी पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांना मोदींचे भाषण ऐकणे ऐच्छिक असल्याचे सांगण्यात आले. याबाबत केंद्र सरकारने कोणतीही सक्ती केलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. भिडे यांनीच याबद्दल माहिती दिली.
शिक्षक दिनानिमित्त उद्या देशभरातील १४ लाख शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आपले विचार ऐकविणार आहेत. मात्र, हे भाषण ऐकण्याची सक्ती करू नये, असा आवाज विरोधकांनी उठविला होता. त्यानंतर भाषण ऐकण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थ्यांवर किंवा शाळांवर नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या भाषणासंदर्भात कोणतेही गैरसमज होऊ नये, म्हणून पुन्हा एकदा ते ऐच्छिक असल्याचे राज्य सरकारला कळविण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त मोदींचे भाषण ऐच्छिक – केंद्र सरकार
मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांना मोदींचे भाषण ऐकणे ऐच्छिक असल्याचे सांगण्यात आले.
First published on: 04-09-2014 at 03:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers day speech is voluntary and not mandatory