MLC Election Result : गेल्या काही दिवसांपासून शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली होती. नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. यासह अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Teachers-Graduate MLC Election Live Update: शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरील मतमोजणी प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्याकडे विजयी आघाडी आहे. अधिकृत निकालाची घोषणा होण्याअगोदरच कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे.
वैध मते – 75622
अवैध मते – 8378
—
सत्यजित सुधीर तांबे : 45607
शुभांगी भास्कर पाटील : 24927
रतन कचरु बनसोडे : 1713
सुरेश भिमराव पवार : 719
अनिल शांताराम तेजा : 70
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 154
अविनाश महादू माळी : 1076
इरफान मो इसहाक : 46
ईश्वर उखा पाटील : 145
बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 466
ॲड. जुबेर नासिर शेख : 191
ॲड.सुभाष राजाराम जंगले : 185
नितीन नारायण सरोदे : 171
पोपट सिताराम बनकर : 37
सुभाष निवृत्ती चिंधे : 117
संजय एकनाथ माळी : 123
एकूण : 84000
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456
सत्यजित सुधीर तांबे : 31009
सत्यजित सुधीर तांबे : 31009
शुभांगी भास्कर पाटील : 16316
रतन कचरु बनसोडे : 1157
सुरेश भिमराव पवार : 360
अनिल शांताराम तेजा : 46
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 100
अविनाश महादू माळी : 623
इरफान मो इसहाक : 28
ईश्वर उखा पाटील : 89
बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295
ॲड. जुबेर नासिर शेख : 103
ॲड.सुभाष राजाराम जंगले : 104
नितीन नारायण सरोदे : 129
पोपट सिताराम बनकर : 37
सुभाष निवृत्ती चिंधे : 83
संजय एकनाथ माळी : 76
नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पाठिंबा दर्शवलेल्या ना.गो.गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर बातमी…
गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता. संपूर्ण भाजपची यंत्रणा गाणारांच्या प्रचाराला लागलेली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. मतदानाच्या दिवशीही ठिकठिकाणी गाणारांसाठी भाजपने बुथ लावले होते.
सत्यजीत तांबेच नाशिकमधून निवडून येणार आहेत, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजनीला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला.
नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांना १५७८४ मतं तर शुभांगी पाटील यांना ७ हजार ८६२ मतं मिळाली. त्यामुळे सत्यजीत तांबे ७ हजार ९२२ मतांनी आघाडीवर आहेत.
पराभवाचं चिंतन करावंच लागेल. गेली १२ वर्षं नागपूरची जागा आमच्याकडे होती. पण आत्ता आमचा पराभव झाला. पराभवाचं विश्लेषण नक्कीच होईल. उणीवांवर काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू. जुनी पेन्शन योजना हा प्रश्न काँग्रेसनं जन्माला घातला होता. त्याचा राग आमच्यावर काढला असेल, तर हे दुर्दैवाचं आहे. याचा राग काँग्रेसवर काढला जायला हवा – चंद्रशेखर बावनकुळे</p>
औरंगाबादमध्ये मविआचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर, भाजपाचे किरण पाटील पिछाडीवर
माझ्यासारख्या माणसानं काँग्रेससारख्या पक्षाबद्दल बोलणं योग्य नाही, पण सत्यजित तांबेंना जर काँग्रेसनं उमेदवारी दिली असती, तर असं काही घडलंच नसतं. त्यामुळे नंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांचं आख्खं घराणं काँग्रेसच्या विचारांचं आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील – अजित पवार
निकाल अजून पूर्ण हाती यायचा आहे. पूर्ण निकाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीवरून वारं बदलतंय वगैरे असं काही नाही. प्रत्येक निवडणुकीत लोकांची मतं, उमेदवार आणि त्याचे परिणा वेगळे असतात – बच्चू कडू, प्रहार संघटनेचे आमदार

सत्यजीत तांबे निवडून आले तर त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडायचे की नाही, यावर हायकमांड निर्णय घेईल – नाना पटोले
नागपूर, अमरावतीत आपण पाहाताय भाजपाची काय गत झाली. तिथे तर त्यांचे विद्यमान आमदार आहेत. दुसऱ्याच्या घरात आग लावत असताना त्यांच्या घरात जनतेनं त्यांना जागा दाखवली. जनता त्याला उत्तर देतीये. नाशिकबद्दल आमची आजही आधीचीच भूमिका होती. त्यांच्या व्यक्तिगत कौटुंबिक वादात पक्षाचं कोणतंही धोरण चुकलं नाही. पक्षाला बदनाम करण्याचं काम कुणी करत असेल, तर ठीक आहे. आमची त्यांच्यावरच्या निर्णयाची तयारी पूर्ण आहे – नाना पटोले
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामानंतरही सुदाकर आडबाले निवडून आले आहेत. त्यामुळे मिंधे सरकारपेक्षा मविआवर मतदार करत असलेल्या प्रेमाचं प्रतिक निवडणुकीतून दिसत आहे – विनायक राऊत
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला.
नागपुरात फक्त ३ उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यासाठी आवश्यक ३ हजार ४०८ मतं मिळवता आली आहेत. त्यात मविआचे सुधाकर आडबाले आणि भाजपाचे नागो गाणार यांचा समावेश आहे. त्यामुळे उरलेल्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली? “दया कुछ तो गडबड है”
देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली ? "दया कुछ तो गडबड है"
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 2, 2023
शिक्षकांच्या अनेक समस्या १२ वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेनं दोन वर्षांपूर्वी मला उमेदवार म्हणून जाहीर केलं. मविआनं मला पुरस्कृत केलं. ३४ संघटनांचा मला पाठिंबा मिळाला. हा एकजुटीचा विजय झाला आहे. भाजपाला जुन्या पेन्शन योजनेचा फटका बसलाय. – सुधाकर आडबाले, मविआचे उमेदवार
नागपुरात मविआच्या सुधाकर आडबाले यांना १४ हजाराहून जास्त मतं मिळाल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्याउलट भाजपाचे नागो गाणार यांना ६ हजार मतं मिळाली आहेत. त्यामुळे आडबाले यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
नाशिकमध्ये पहिल्या फेरीच्या मोजणीला सुरुवात झाली असून सत्यजीत तांबे आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे.
नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांचे प्रतिनिधी एका मतमोजणी केंद्रावर एका टेबलवर जास्त झाल्यामुळे गोंधळ, पोलिसांनी केली मध्यस्थी…
अमरावती पदवीधर मतदारसंघात एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. भाजपाचे नेते, विद्यमान आमदार, माजी मंत्री रणजीत पाटील हे अजूनही पिछाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. काही वेळाने दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु होईल. तेव्हा अंतिम चित्र स्पष्ट होईल.
आम्हाला आधीपासून विश्वास होता की सुधारकर आडबाले विजयी होती. एक सक्षम उमेदवार मविआनं दिला होता. पदवीधरमध्ये भाजपा नाही, शिक्षकांमध्ये भाजपा नाही, विधानसभेतही भाजपा नसणार आणि पुढे लोकसभेतही भाजपा नसेल – विजय वडेट्टीवार
अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या आज, गुरुवारी सुरू असलेल्या मतमोजणीसाठी आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे संतनगरी शेगावमार्गे अमरावतीत दाखल झाले. त्यापूर्वी शेगावात प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना त्यांनी आपणास विजयाची खात्री असल्याचे आत्मविश्वासपूर्वक सांगितले.
इथे धनशक्ती आणि वारसा जिंकणार नाही. संघर्ष आणि जनता इथे जिंकेल – शुभांगी पाटील
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता अजनीच्या समुदाय भवन येथे सुरुवात झाली. २१ टेबलवर मोजणी सुरू आहे. तेथे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक मोजणीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले आघाडीवर असल्याची माहिती आहे.
कोट्यापेक्षा जास्त मतदारांना मी ओळखते. त्यांनी मतदान कुणाला केलंय हे मला माहिती आहे. आता हे सगळं मॅनेज होऊ शकत नाही – शुभांगी पाटील
नागपूर शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि भाजपाचे नेते नागो गाणार हे पिछाडीवर असून सुधाकर अडबाले हे ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.