सोलापूर : शेअर बाजारात ४७ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास अवघ्या वर्षभरात तब्बल दीड कोटी रुपये मिळतात, अशी भुरळ पाडून एका माजी शिक्षकाने इतर शिक्षकांना सुमारे २१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. संबंधित माजी शिक्षकाविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> सोलापूर: अल्पवयीन मुलीचा वृद्धांकडून विनयभंग

महादेव शिवाजी पालक (वय ३४, रा. सुभाषनगर, बार्शी, सध्या रा. कोल्हाड, ता. रोहा, जि. रायगड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी महादेव लक्ष्मण शिंदे (वय ५९, रा. शिक्षक कॉलनी, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फसवणुकीचा प्रकार १ सप्टेंबर २०२० ते २६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला आहे. शिंदे हे शिक्षण खात्यात सेवेत असताना पालक हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक पदावर सेवेत होता. शिक्षकी पेशा सांभाळून तो शेअर बाजारातील गुंतवणुकीचा व्यवसाय करीत असे. नंतर त्याने शिक्षकी पेशा सोडून पूर्णवेळ शेअर बाजारातील व्यवसाय सुरू केला होता. तो काम करीत असलेल्या कंपनीत ४७ हजार रुपये शेअर गुंतवल्यास अवघ्या एक वर्षात तब्बल दीड कोटी रुपयांचा परतावा मिळतो, असे आमिष त्याने दाखवले होते.

हेही वाचा >>> Puja Khedkar : ‘मला अपात्र ठरविण्याचा UPSC ला अधिकार नाही’, फसवणूक प्रकरणावर पूजा खेडकर काय म्हणाल्या?

शिंदे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतः आणि पत्नीच्या नावे ९४ हजारांची गुंतवणूक केली. नंतर पालक याने त्यांच्या गुंतवणुकीत वाढ होत असल्याचे सांगितले. तसेच अन्य गुंतवणूकदार गोळा केल्यास बक्षीस मिळण्याचे आमिष दाखवले. यामुळे शिंदे यांनी इतर ओळखीच्या शिक्षकांना या योजनेत ओढले. प्रत्येकी ४७ हजार रुपये गुंतवणूक केलेले ४३ शिक्षक आणि प्रत्येकी १७ हजार रुपये गुंतवणूक केलेले चार शिक्षक योजनेत सामील झाले. पुढे हा संपूर्ण प्रकार फसवणूक करणारा ठरला. या घटनेमुळे बार्शीतील शिक्षक वर्गात खळबळ माजली आहे. बार्शी शहर पोलीस आरोपी महादेव पालक याचा शोध घेत आहेत.