मराठी रंगभूमीवरील ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या गाडीचा आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात बॅकस्टेज आर्टिस्टचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात लोकसत्ता ऑनलाईनने या नाटकाचे दिग्दर्शक नंदू माधव यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाच्या सामानाचा टेम्पो आज मुंबईला येणार होता. या टेम्पोतून केवळ नाटकाचे सामान येणार होते. नाटकातील कलाकार ट्रेनने मु्ंबईला परतरणार होते. पण आमचा एक कलाकार प्रवीण हा त्याचे फोटोशूट असल्यामुळे या टेम्पोनेच मुंबईला यायला निघाला होता. त्याच्याबरोबर नाटकामध्ये बॅकस्टेज सांभाळणाराही एक कलाकार होता. प्रवासादरम्यान गेवराई रस्त्यावर चालकाचा डोळा लागला आणि त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो कॅनॉलमध्ये जाऊन पडला. यामध्ये प्रवीण आणि टेम्पोचालक हे जखमी झाले आहेत. तर बॅकस्टेजच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे मला कळलेय, असे नंदू माधव म्हणाले. जखमींना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा