मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील मेळाव्याच्या ठिकाणावरुन सुरु असणाऱ्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात निर्णय दिला. दोन्ही गटांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवलेल्या शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर शिंदे गट मेळावा कुठे घेणार यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्या. मागील अनेक दिवसांपासून ज्या वांद्रा-कुर्ला संकुलामधील मैदानाचं नाव चर्चेत होतं तिथेच शिंदे गटाचा मेळावा होणार असून या मेळाव्याचा पहिला टीझर मुख्यमंत्री शिंदेंनी ट्वीट केला आहे. विशेष म्हणजे या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आवाज वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याचा उल्लेख ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ असा करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> ‘खरी शिवसेना’ वाद : “सध्या शिंदेसाहेबांनी पक्षप्रमुख पदावर…”; दिपक केसरकरांचं पक्षप्रमुख पदाबद्दल महत्त्वाचं विधान

टीझरच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती दिसते. त्यानंतर बाळासाहेबांचा मूर्ती आणि शेवटी एकनाथ शिंदेंची मूर्ती सदृश्य प्रतिमा दिसते. व्हॉइस ओव्हरमध्ये बाळासाहेबांच्या आवाजात, “शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगाव झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सातत्याने आस्मानात फडकत राहिला पाहिजे,” हे वाक्य ऐकू येतं. तसेच शेवटी, “जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्” हे सुद्धा बाळासाहेबांच्या आवाजातच ऐकू येतं. “एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य,” अशी ओळ त्यानंतर झळकताना दिसते. मुख्यमंत्र्यांच्या फोटोजवळच ‘एकलव्य’ हा शब्द झकताना दिसतो. खरी शिवसेना कोणाची याचा निकाल निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीमध्ये लागणार आहे. त्यापूर्वीच शिंदे गटाने आपल्या मेळाव्याला ‘शिवसेनेचा मेळावा’ असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ‘खरी शिवसेना’ वाद: निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार? उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडून आलेल्या आमदार, खासदारांची…”

शिवसेनेची ओळख असणारा डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्या बाजूला, “गर्व से कहो हम हिंदू हैं” हे वाक्यही टीझरमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे, “शिवसेनेचा दसरा मेळावा हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार…” अशी ओळीही या टीझरमधील फोटोवर दिसतात. दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच ५ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजता, बी. के. सी. मैदान, वांद्रा, मुंबई येथे हा मेळावा होणार आहे असंही व्हॉइस ओव्हरमधून सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: “ते लोक आईवर…”; रश्मी ठाकरेंसंदर्भात शिंदे गटाने केलेल्या दाव्यावरुन आदित्य ठाकरे संतापले

नक्की वाचा >> उद्धव ठाकरे म्हणतात, “शिवसेना सज्ज, येईल त्या परिस्थितीला…”; शिंदेंना लक्ष्य करत म्हणाले, “कमळाबाईंच्या कोठ्यावर दौलतजादा करून…”

हा टीझर अवघ्या २० सेकंदांचा आहे. शिंदेंनी हा टीझर पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्याला हजारोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader