सोलापूर : राज्य शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने आवश्यक दाखल्यांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची सेतू सेवा केंद्रांवर झुंबड उडाली असताना दुसरीकडे आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या ॲपवर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी ‘ नारी शक्ती दूत ‘नावाचे ॲप उपलब्ध झाले आहे. स्मार्टफोनमध्ये ‘ गूगल प्ले ‘ ॲपच्या माध्यमातून आॕनलाईन अर्ज भरता येते. रहिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आदी आवश्यक दाखले व कागदपत्रे आॕफलाईन पध्दतीने दाखल केल्यानंतर त्याची माहिती आॕनलाईन भरावी लागते. १० एमबी क्षमतेचे नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड केल्यानंतर पुढे पहिल्या टप्प्यातच अटी व शर्ती मान्य करून लागीन करताना ॲपवर तांत्रिक अडचण येते.

Jitendra Awhad
“माझं दुःख ऐकून घ्या, मी कटोरा घेऊन…”, जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत मांडली व्यथा
19 kg LPG cylinder rates slashed by Rs 30 form today
LPG Gas Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; आता किती रुपयांना मिळणार सिलिंडर? असे आहेत नवे दर!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Aditi Tatkare on ladki bahin scheme
खुशखबर! माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ‘या’ तारखेनंतरही सुरू राहणार; आदिती तटकरेंची माहिती
Sudhir Mungantiwar jayant patil
“मुनगंटीवार कार्यक्षम मंत्री, ते राज्यातच राहिल्याने…”, जयंत पाटलांनी कौतुक करत जखमेवर मीठ चोळलं

हेही वाचा >>> खुशखबर! माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ‘यातारखेनंतरही सुरू राहणार; आदिती तटकरेंची माहिती

ॲपवर आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रातील सेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु स्मार्टफोनवर ॲप डाऊनलोड केल्यानंतर प्रत्यक्षात ॲप सुरू होत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येत नसल्याची अडचण समोर येत आहे. त्याचा त्रास संबंधित अंगणवाडी सेविकांसह अर्जदार महिलांना सहन करावा लागत आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले मिळण्यासाठी सेतू सेवा केंद्रांवर महिलांची गर्दी उसळली आहे. शासनाने काही कागदपत्रांमध्ये सलवती दिल्या असल्या तरी सेतू सेवा केंद्रांवरील महिलांची गर्दी कमी होत नाही. आवश्यक दाखले मिळवून देण्यासाठी खासखी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यासाठी महिलांना दिवसभर सेतू सेवा केंद्रांवर दिवसभर तिष्ठत राहावे लागत असताना दाखले मिळण्यासाठी एजंटांना जादा पैसे द्यावे लागत आहेत. यात आर्थिक पिळवणूक होत असताना दुसरीकडे आॕनलाईन अर्ज भरण्यातही तांत्रिक अडचण येत असल्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा >>> “महायुतीने लोकसभेला एकेका मतदारसंघात ७०-८० कोटी वाटले”, आव्हाडांचा आरोप; भाजपाच्या उत्तरानंतर सभागृहात खडाजंगी

तूर्त आॕफलाईन अर्ज भरून घेणार

लाडकी बहीण योजनेसाठी आॕनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सेविकांवर आॕनलाईन अर्ज भरून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा विचार करता आॕनलाईन अर्जा भरतानाची तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या महिलांचे आॕफलाईन अर्ज अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -प्रसाद मिरकले, महिला व बालकल्याण विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर