महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पूत्र तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू आहे. तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळाल्या आहेत. परंतु, तेजस ठाकरे यांना राजकारणापेक्षा वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्येच जास्त रस असल्याचं नेहमी सांगितलं जातं. गेल्या वर्षी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या वेळी अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, तेजस ठाकरे यांचे मोठे बंधू आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

तेजस ठाकरे यांचा आज २७ वा वाढदिवस आहे. यानिमत्त शिवसैनिकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही तेजस ठाकरे यांना शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे. तसेच हे ट्वीट करताना त्यांनी तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”

किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की निसर्गप्रेमी, वाइल्डलाईफ फोटोग्राफर, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेले सुप्रसिद्ध अभ्यासू वन्यजीव संशोधक तेजस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ही तोफ लवकरच धडाडणार, विरोधकांसह गद्दारांच्या छातीत धडकी भरवणार!

हे ही वाचा >> अमित शाहांच्या भेटीबाबत अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील हे…”

खरंतर वन्यजीव संशोधन हे तेजस ठाकरे यांचं आवडतं क्षेत्र आहे. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. अलिकडेच त्यांनी हिरण्यकेशी मासा, गोड्या पाण्यातला दुर्मिळ खेकडा, पाल आणि सापाच्या नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत.