सांगली : तांबडा-पांढरा रस्सा, रसरशीत सुक्के आणि तोंडलावणीला चिकनचे तळण, चपाती आणि मसाले भात असा अस्सल कोल्हापूरी जेवणाचा बेत मंगळवारी इस्लामपूर नजीक साखराळे येथील पाटलांच्या वाड्यावर होता. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी हा खास बेत होता. याचबरोबर शाकाहारीमध्ये श्रीखंड चपातीचीही व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा >>> शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पाटील यांचा बीआरएसमध्ये प्रवेश
तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री.राव यांनी बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात राजकीय विस्तार करण्याचा चंग बांधला आहे. आषाढी वारीवेळी पंढरपूर दौरा केल्यानंतर साहित्यरत्न अण्णा भाउ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी आज पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा >>> उजनी आता जिवंत होणार, उपयुक्त पाणी साठ्यात भर पडायला सुरुवात….
वाटेगावमधील कार्यक्रमआटोपल्यानंतर मुख्यमंत्री राव यांनी साखराळे येथील पाटील वाड्यावरील मेजवाणीचे आमंत्रण स्वीकारले होते.यासाठी वाड्यावर मांसाहारी व शाकाहारी असे पाचशे जणांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री. राव यांच्यासोबत तेलंगणाहून आलेल्या पाहुण्यासाठीच हा बेत होता. यामुळे स्थानिकांना आमंत्रणच देण्यात आलेले नव्हते. शाकाहारीमध्ये चपाती, श्रीखंड, बटाटा भाजी आणि मसाला भात असा बेत होता, तर मांसाहारी मध्ये सुके मटण, चिकनचे तळण चिकन- 65, तांबडा व पांढरा रस्सा असा बेत होता. मुख्यमंत्री राव यांनी रघुनाथदादांच्या सोबत मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. तेलंगणाचे मुख्यमंत्री असल्याने यावेळी कडेकोट बंदोबस्त असल्याने केवळ निमंत्रित आणि मोजक्याच लोकांना वाड्यात प्रवेश होता.