मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील घडामोडींसह राज्यातील वातावरणामध्ये हवेचा दाब कमी झाला असून, अग्नेयेकडून येणारे वारे बाष्प वाहून आणत असल्याने राज्यात थंडीला अडसर निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पुढील काही दिवस राज्यात थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचप्रमाणे ११ डिसेंबरला हिंदूी महासागर, बंगालच्या उपसागरावरील हवेचा दाब कमी होणार आहे. श्रीलंकेजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्राकार वारे वाहणार आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्वाचा परिणाम राज्याच्या वातावरणावर होत आहे. राज्यात हवेचा दाब कमी होतो आहे. पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेशातील बहुतांश भागात हवामान ढगाळ राहून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्याच्या बहुतांश भागात सध्या किमान तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांची अधिक आहे. पुण्यातील तापमान १६. १ अंशांवर आहे. पुण्यात पुढील काळात निरभ्र आकाश राहणार असल्याने थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही सध्या किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. कोकण विभाग, मुंबईमध्ये मात्र सरासरीच्या आसपास तापमान आहे.  मुंबईत शनिवारी २२.० अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. महाबळेश्वरचा अपवाद वगळता राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या वर आहे.