उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा वाढला

उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून, त्या भागातून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे राज्याच्या सर्वच भागातील किमान तापमानात घट झाली आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये गारठा चांगलाच वाढला आहे. या भागात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ५ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला आहे. थंडीचा कडाका आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Maximum temperature drop in Mumbai,
मुंबईच्या कमाल तापमानात घट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
pune cold spell in Pune subsided with temperatures rising and light rain expected from December 26
थंडीचा कडाका सरला, आता हलक्या पावसाची चिन्हे
Cold response to hearing on objections to inclusion of 29 villages in Vasai Virar Municipal Corporation
२९ गावांवरील सुनावणीला थंड प्रतिसाद, ३ दिवसांची मुदत वाढवली
On Monday cold wave affected Nagar Pune Malegaon Marathwada Gondia, Nagpur and Akola
नगरमध्ये थंडीचा कहर; १९७०ची पुनरावृत्ती जाणून घ्या, महाराष्ट्रसह देशभरातील थंडीची स्थिती
After Mumbais temperature dropped pollution levels in city have increased again
मुंबईच्या हवा प्रदूषणात पुन्हा वाढ, नेव्ही नगर कुलाबा येथील हवा ‘अतिवाईट’
Cold wave North Maharashtra, Cold Vidarbha,
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाटसदृश्य स्थिती ? जाणून घ्या, थंडी का वाढली?
mumbai, Coldest December, minimum temperature
मुंबई : नऊ वर्षांतील थंड डिसेंबर

उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट आहे. पंजाबच्या अमृतसरमधील तापमान १.० अंशांपर्यंत खाली आले आहे. सपाट भूभागावरील देशातील हे नीचांकी तापमान ठरले आहे. राज्यातील निरभ्र आकाश आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत सर्वच भागातील किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. थंड वाऱ्यांचा परिणाम म्हणून निफाड येथे १.८ अंशांपर्यंत तापमान घसरले होते.

शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातही किमान तापमानात घट झाली. कोकणात सरासरीच्या तुलनेत तापमानात १ ते ५ अंशांनी घट नोंदविण्यात आली. मुंबईतील सांताक्रुझ येथील किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ अंशांनी घट झाली.

किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) १८.५, सांताक्रुझ १५.८, अलिबाग  १५.२, रत्नागिरी १७.३, पुणे ७.४, नाशिक ७.८, जळगाव ६.४, कोल्हापूर १५.९,  महाबळेश्वर ९.६, मालेगाव ७.८, सांगली ११.९, सातारा १०.७, सोलापूर ११.६, औरंगाबाद ८.२, परभणी ८.९, नांदेड   १२.०, अकोला, बुलडाणा, ब्रह्मपुरी आणि गोंदिया प्रत्येकी ८.५, अमरावती १०.६, चंद्रपूर आणि यवतमाळ प्रत्येकी १०.०,वाशिम ९.०, वर्धा १०.५.

 

Story img Loader