पूर्वपरवानगी न घेताच बसवलेला महापुरुषांचा पुतळा हटवल्याने कंधार तालुक्यातील गऊळ येथे संतप्त झालेल्या नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर शुक्रवारी गावात अजूनही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत ४o जणांना ताब्यात घेतले आहे.

गऊळ येथे मध्यरात्री अज्ञातांनी महापुरुषांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. कोणतीही परवानगी न घेताच हा पुतळा बसविल्याने पोलिसांनी तो हटविण्याचा आदेश दिला. मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्याने सायंकाळी पोलीस बंदोबस्तात पुतळा हटविण्यात आला आहे. सकाळी हा पुतळा दिसताच ग्रामस्थही अवाक् झाले. पोलिसांना कोणताही थांगपत्ता न लागू देता अज्ञातांनी पुतळा बसवला, मात्र सकाळी पोलिसांना पुतळा दिसल्यानंतर गावात वाद सुरू झाला. कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसविल्याने तो हटवा अशी भूमिका पोलिसांनी घेतली. पुतळा बसविण्यास विरोध नाही. पण रितसर परवानगी घेऊन तो बसवावा अशी सूचना पोलिसांनी केली. पण त्याला काही ग्रामस्थांनी विरोध केला. संबंधित पुतळा हटवू नये, आम्ही संरक्षण करू अशी भूमिका त्यांनी मांडली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रितसर परवानगीसाठी पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. तोपर्यंत हा पुतळा हटवू नये असे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण पुतळा हटवू देणार नाही, अशी भूमिका गावातील काही ग्रामस्थांनी घेतली आहे.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांच्या उपस्थिती पुतळ्याची संरक्षण समिती स्थापना करण्यात आली. २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी मोठा फौजफाटा नेत लाठीमार करत पुतळा हटवल्याने गऊळ मोठा तणाव निर्माण झाला. याप्रकरणी ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .सदरील प्रकरणाचा पुढील तपास एपीआय लोणीकर करीत आहेत.