लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दल आक्षेपाई संदेश समाज माध्यमावर प्रसारित केल्याने शुक्रवारी मिरज शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी तातडीने हालचाली करून संशयिताला ताब्यात घेतल्याने परिस्थिती निवळली.
श्री. भिडे यांच्याबद्दल एक व्यंगचित्र तयार करत सोबत एक संदेश एका व्यक्तीने समाज माध्यमावर प्रसारित केला. याबाबतचे वृत्त समजताच शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात येउन संशयितावर कठोर कारवाईची मागणी करत ठिय्या मारला. पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या आदेशाने काही वेळात संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणी संबंधितावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.