खेड : खेड शहरा लगत असलेल्या देवणे पुलाखाली रविवारी सायंकाळी पाच ते सहा गोवंशाचे अवयव आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संशयित समाजकंटक यांना अटक करण्याची मागणी करत रास्ता रोको केल्याने काही कालावधीसाठी येथील वहातुक खोळंबली.

खेड देवणे पूल परिसरात खाडी मार्गावर गोवंश हत्येचे वृत्त पसरल्याने तणाव निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची जादा कुमक मागवली. देवणे पुलाच्या खाली गोवंशाचे जे अवयव सापडले त्यांचा पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतले. मात्र, यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संशयित समाजकंटकांना अटक करण्याची मागणी करत रास्ता रोको केला.

आणखी वाचा-निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा या मागणीसाठी निवळी-हातखंबा ग्रामस्थांचे आंदोलन

शिवसेना तालुकाप्रमुख धाडवे यांनी ही घटना निंदनीय असून यातील समाजकंटकांना अटक करण्यासाठी आम्ही पोलिसांना वेळ देत असून त्यानंतर आम्ही स्वतः त्यांना शोधू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Story img Loader