वाई:सातारा शहरात हातात शस्त्र (कोयता)घेऊन दहशत माजविणारा टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मोळाचा ओढा येथील एका हॉटेलमध्ये जेवण देण्यास नकार दिल्याच्या कारणातून हातातील शस्त्र (कोयता)नाचवून तीन ते चार जणांनी दहशत माजविली. हॉटेल बंद झाल्याने जेवण देण्यास व्यवस्थापनाने नकार दिल्याने त्यांनी दारूच्या नशेत चिडून जाऊन कर्मचाऱ्यांवर हातातील शास्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला.वार चुकवत हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याने कोणी जखमी झाले नाही.

हेही वाचा >>> आंदोलन गुंडाळण्यासाठी ५० खोक्यांची ऑफर? मॅनेज होण्याबद्दल मनोज जरांगे स्पष्टच बोलले

या टोळीने हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीची या शस्त्राने तोडफोड केली.यावेळी हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या ग्राहकांनाही भीतीने पळ काढलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान पोलिसांची रात्र गस्त या भागात वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुन्हा एकदा हातात शस्त्र घेऊन दहशत करणारी टोळी सक्रिय झाल्याने  व्यवसायिकांच्यात  भीतीचे वातावरण  झाले आहे.  पोलिसांनी हातात शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन एका  संशयिताला अटक केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत असल्याचे साताऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.