सांगली : सांगलीत गाजलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्यात शुक्रवारी राज्य गुप्तचर विभागाचे उपअधिक्षक मुकुंद कुलकर्णी यांना अस्वस्थ वाटल्याने साक्ष स्थगित करण्यात आली. या खटल्यातील महत्वपूर्ण साक्ष उद्या होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलीसांच्या मारहाणीत कोठडीत कोथळेचा मृत्यू झाला. या प्रकरणी तत्कालिन फौजदार युवराज कामटे याच्यासह सहा संशयिताविरुध्द जिल्हा सत्र न्यायालयात खटला चालू आहे. शुक्रवारी कोथळे खून खटल्यात तपास अधिकारी व तत्कालीन सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या साक्षीस सुरवात झाली. यावेळी संशयित आरोपी लाड याची  गुन्ह्यात वापरलेली सेलेरिओ मोटार आणि मोटारीतील वस्तू चादर, रेनकोट,काडीपेटी , छत्री आणि नॅपकिन या वस्तू ओळखल्या. साक्ष सुरु असतानाच श्री.कुलकर्णी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आजचे कामकाज तहकूब करण्यात आले. शनिवारी कुलकर्णी यांची साक्ष पुढे चालणार आहे. ही साक्ष ह्या खटल्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची समजली जाते आहे. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पहात आहेत.