शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘नौटंकी’ म्हणत सडकून टीका केली. यानंतर याला ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं. ते रविवारी (९ जुलै) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

भाजपा आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर अरविंद सावंत म्हणाले, “कुठल्या माणसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी हे ठरवलं पाहिजे. ज्यांच्या पक्षाचं नाव स्वाभिमानी असताना लाचार झालेल्या पक्षाच्या लोकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ नये.”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

“हे बावनकुळे नाही, तर बावनखुळे आहेत”

चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला ‘नौटंकी’ म्हणत टीका केली. त्यावर अरविंद सावंत म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे हे बावनकुळे नाही, तर बावनखुळे आहेत.”

दरम्यान, सावंत यांच्या टीकेला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर देत एकेरी उल्लेख करत कपडे फाडण्याचा इशारा दिला आहे. प्रसाद लाड म्हणाले, “काल परवापर्यंत घरी बसलेले झोपी गेलेले जागे झाले आहेत आणि दौऱ्यावर निघाले. अशा परिस्थितीत उकळत्या पाण्याला खळखळाट फार अशी परिस्थिती अरविंद सावंत यांची झाली आहे. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोलताना तोंड सांभाळून बोलावं. त्यांचा खुळखुळा झाला आहे. काल ते पोपट मेला, पोपट मेला असं म्हणत होते. तो त्यांचाच ‘बॉस’ नावाचा पोपट मरायला आला आहे. म्हणून तो घरातून बाहेर पडला आहे.”

“अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर पडले नाही, मानेला पट्टे लावून फिरले”

“अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना ते कधी घरातून बाहेर पडले नाहीत. जनतेला भेटले नाहीत. मानेला पट्टे लावून फिरले आणि आता ते आम्हाला सांगतात की, आम्ही बाहेर पडलो आणि चंद्रशेखर बावनकुळे खुळे आहेत,” अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.

हेही वाचा : “…तर एकनाथ शिंदे आमच्याकडे आलेच नसते”, उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावरून सुधीर मुनगंटीवारांचा टोला

“…तर त्यांचा एकेरी उल्लेख करून कपडे फाडणार”

“मी अरविंद सावंतांना एक सांगतो की, चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे नेते आहेत. ते महाराष्ट्र भाजपाचं नेतृत्व करत आहेत. अरविंद सावंतांना मी परत परत साहेब म्हणतो आहे. मात्र, त्यांनी यापुढे अशी चूक केली, तर त्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचे कपडे फाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, एवढंच सांगतो,” असा जाहीर इशारा लाड यांनी सावंत यांना दिला.

Story img Loader