उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्याची सूत्रे हाती आल्यानंतर आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला. यानंतर विरोधकांकडून टीका होत आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना कसल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही. हा आमच्या आमदारांवर झालेला अन्याय आहे. हा मुद्दा अधिवेशनात मांडला जाईल, असं अंबादास दानवे म्हणाले. ते मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

निधी वाटपावर भाष्य करताना अंबादास दानवे म्हणाले, “अजित पवार हे आम्हाला निधी देत नाहीत, म्हणून आम्ही शिवसेना सोडली, असं सांगत आमच्या पक्षातील ४० गद्दार तिकडे गेले होते. आता अजित पवार यांनी त्यांच्याबरोबर गेलेल्या आणि त्यांच्याबरोबर न गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही २५ ते ५० कोटी रुपयांचं निधी वाटप केलं आहे. फक्त २५ कोटी नव्हे तर ५० कोटीपर्यंत निधी दिला आहे. एक-दोन आमदारांनी यादी दिली नाही, म्हणून त्यांना निधी दिला नसेल, बाकी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना अजित पवारांनी निधी दिला आहे.”

डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
Uddhav Thackeray Criticized Amit Shah and Modi
Uddhav Thackeray : “हिटलर आणि मुसोलिनीही भरघोस मतांनी…”; उद्धव ठाकरेंची मोदी-शाह यांच्यावर बोचरी टीका

हेही वाचा- “…तर राष्ट्रवादीचे नेते आता तुरुंगात असते”, ठाकरे गटाच्या नेत्याचं थेट विधान…

“आता आमचे शिवसेनेचे जे आमदार ओरडत होते. टाहो फोडत होते. आम्ही स्वाभिमानाने गेलो, असं सांगत होते. ते आमदार आता अजित पवारांच्या निर्णयावर काय बोलणार? यावर आता शिंदे गटाने उत्तर द्यावं, अशी माझी भूमिका आहे,” असंही दानवे म्हणाले.

हेही वाचा- “भाजपाकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी”, ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं विधान

“ठाकरे गटाच्या आमदारांना वर्षभरात निधी मिळाला नाही”

अंबादास दानवे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्याबरोबर थांबलेल्या आमदारांना या वर्षभरात कोणताही निधी मिळाला नाही. ठाकरे गटाच्या आमदारांना सापत्न वागणूक दिली जातं आहे. सरकारकडून मंजूर झालेल्या निधीवरील स्थगिती अद्याप उठवली नाही. त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाईल. काहीजण न्यायालयातही गेले आहेत. त्यांच्या आमदारांना ५० कोटी दिले म्हणून आम्ही आमच्या आमदारांनाही ५० कोटीच द्या, अशी मागणी आम्ही करत नाही. पण आमच्या आमदारांना किमान ३० किंवा २० कोटी तरी द्या, अशी आमची भूमिका आहे. पण अशाप्रकारे जर निधीचं वाटप होत असेल तर तो अन्याय आहे.”

Story img Loader