राज्यात सत्तांतर झाल्यापासून एकीकडे शिंदे गट आणि भाजपा तर दुसरीकडे ठाकरे गट असं चित्र निर्माण झालं आहे. दोन्ही बाजूंनी सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान सिंधुदूर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संघर्षाचं चित्र पाहायला मिळाल. बैठकीत ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात खडाजंगी झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंधुदूर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने नारायण राणे आणि विनायक राऊत आमने-सामने आले होते. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. बैठक कोण चालवत आहे? अशी विचारणा विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केली.

नेमकं काय झालं?

सभेच्या अजेंड्यानुसार बैठक चालावी असं नारायण राणे यांचं म्हणणं होतं. दरम्यान विनायक राऊत यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारचा मुद्दा मांडला. मागील सरकारने घेतलेले सर्व निर्णय सध्याच्या सरकारने रद्द केले असून, त्यावर विचार व्हावा असं ते म्हणाले. नारायण राणे यांनी यावेळी मध्यस्थी करत अजेंड्यावर असणारे विषय आधी घेऊयात असं सांगितलं. त्यावर विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला. यावर विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना ‘ही बैठक नेमकं कोण चालवत आहे?’ अशी विचारणा केली.

यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ शाब्दिक चकमक सुरु होती. यामुळे बैठकीत काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray faction mp vinayak raut and narayan rane word fight during meeting sgy