शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ठाकरे हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. औरंगाबादमध्ये या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पतंगबाजीचा फंडा वापरण्यात आला. सिनेमाचे नाव आणि तारीख असलेले भगवे पतंग आज आकाशात बघायला मिळाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी पुन्हा एकदा बाळासाहेबांचे नाव या सिनेमामुळे चर्चेत आले आहे

राज्य पातळीवर शिवसेनेचे नेते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जीवाचे रान करत असतांना आता शिवसैनिकांनी देखील ही जबाबदारी स्वीकारली आहे. औरंगाबादेत मकरसंक्रांती निमित्त शिवसेनेच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांनी हडको भागातील टीव्ही सेंटर मैदानावर पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख असलेले शेकडो भगवे पतंग आकाशात उडवण्यात आले. शिवसेनेच्या या अनोख्या प्रमोशनची शहरभर चर्चा सुरू होती.

Story img Loader