बॉलिवूड अभिनेत्री काजोलने काही दिवसांपूर्वी राजकीय भाष्य केलं होतं. “देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते”, असं ती म्हणाली होती. परंतु तिच्या या वाक्यावरून तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. इतकं ट्रोल केलं गेलं की तिला तिच्या वक्तव्याबाबत नंतर स्पष्टीकरणही द्यावं लागलं. या प्रकरणावरून ठाकेर गटाने केंद्र सरकारवर आणि भाजपा समर्थकांवर टीका केली आहे.

“देशाचे सध्याचे राजकारण म्हणजे अडाण्यांचा गाडा झाला आहे व त्यावरच अभिनेत्री काजोलने आपले परखड मत व्यक्त केले. शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने म्हटले. आपल्या देशातील अंधभक्तांनी यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अंधभक्तांनी असा समज करून घेतला की, काजोलने सध्याच्या दिल्ली सरकारवर आपले मत व्यक्त केले व त्यांनी काजोलला नेहमीप्रमाणे ‘ट्रोल’ करण्यास सुरुवात केली. आपल्या देशातील एक उच्चशिक्षित कलाकार लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगते व तसे केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या ‘ट्रोल धाडी’ त्या अभिनेत्रीवर तुटून पडतात. देशात वैचारिक बदलांची प्रक्रिया खूपच संथगतीने सुरू आहे. कारण शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने सांगितले. काजोलचे मत हे अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे”, असं ठाकरे गटाने त्यांचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”

हेही वाचा >> “आपल्या देशातील नेते अशिक्षित, त्यांच्याकडे…”, बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं वक्तव्य चर्चेत

काजोल महाराष्ट्रकन्या म्हणूनच…

“ती म्हणते, ”आपण अजूनही परंपरा आणि जुन्या विचारधारेत अडकून पडलो आहोत. याचे कारण अर्थातच शिक्षणाचा अभाव हेच आहे. देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते. विविध दृष्टिकोनातून पाहण्याची संधी तुम्हाला शिक्षणामुळेच मिळते’, असे काजोलने सांगितले. यात तिचे काय चुकले? पण चौथी पास राजाचे अंधभक्त, समर्थक काजोलवर तुटून पडले. काजोल महाराष्ट्रकन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच. पुन्हा शिक्षणासंदर्भात विचार देणारे महात्मा फुले याच मातीतले. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पुरस्कार केला. ते सांगतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले! महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी लोकांना शहाणे व शिक्षित करण्यासाठी शर्थ केली. त्याच सावित्रीची लेक काजोल शिक्षणाची महती सांगत आहे. काजोलने शिक्षणाचे महत्त्व सांगितले, ते नेमके कुणाला व का झोंबले? तिने तर कुणाचेच नाव घेतले नव्हते”, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

प्रश्न चहा विकणारा पंतप्रधान झाला हा नाही, तर…

“देशातील विकास, शिक्षण, लोकशाही यावर तिला मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, ”शिका व संघर्ष करा.” अज्ञान हे घातक असते. अज्ञानातून अंधश्रद्धा व अंधभक्तांची पैदास वाढते. भारत देश सध्या या अंधारातून प्रवास करीत आहे. अंधभक्तांना काजोलचे वक्तव्य झोंबले. कारण त्यांच्यासमोर त्यांचे विश्वगुरू पंतप्रधान मोदींचे चित्र व चरित्र आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातमधील एका प्लॅटफॉर्मवर चहा विकत होते, पण ते ज्या गावात चहा विकत होते असे सांगतात, त्या गावात तेव्हा रेल्वेही नव्हती तर प्लॅटफॉर्म तरी कसा असेल? प्रश्न चहा विकणारा पंतप्रधान झाला हा नाही, तर पंतप्रधान त्यांची शैक्षणिक अर्हता लपवीत आहेत. आपण उच्चविद्याविभूषित आहोत, हे दाखविण्यासाठी मोदी यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांनी एक बनावट ‘डिग्री सर्टिफिकेट’ जाहीर केले. पंतप्रधानांना शेवटी त्यांची डिग्री लपवून ठेवावी लागली व सर्वत्र त्यांचे हसे झाले”, असा प्रहारही सामनातून करण्यात आला आहे.

“करोना काळात पंतप्रधान मोदी यांनी ‘थाळ्या व घंटा’ वाजवून करोना पळवून लावण्याचे आवाहन केले. कोणतीही पूर्वकल्पना न देता नोटाबंदी जाहीर केली व लोकांना रांगेत उभे करून मारले हे शैक्षणिक पार्श्वभूमी नसल्याचेच ‘झटके’ आहेत. पंतप्रधान मोदींचे सहकारी तर त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत. हिंदूंनी चार पोरांना जन्म द्यावा. लोकसंख्या वाढवावी, असे मोदींचे मंत्री सांगतात. चार पोरांपैकी दोन ‘संघा’ला द्या असेही सांगतात. हे सभ्य व सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही”, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

शिक्षणाचा अभाव असल्याचे हेच लक्षण

“मध्य प्रदेशात भाजपचा एक पदाधिकारी एका गरीब मागासवर्गीय व्यक्तीच्या अंगावर लघुशंका करतो. मग त्या पीडित व्यक्तीस मुख्यमंत्री शिवराजमामा त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्याची पूजा करतात. आता समजले की, ज्याची पूजा केली ती व्यक्ती कुणी वेगळीच होती. त्यामुळे मामांचे हसे झाले. हेच शिक्षण व शहाणपण नसल्याचे लक्षण. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची भाषा करतात. भोपाळच्या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांच्या भ्रष्टाचारावर हल्ला केला, पण लगेच दुसऱ्या दिवशी भाजपने अजित पवारांच्या गटास त्यांच्या भ्रष्टाचारासह स्वीकारले. शिक्षणाचा अभाव असल्याचेच हे लक्षण”, अशीही टीका ठाकरे गटाने केली आहे.

धर्माचा गांजा ओढून…

“जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ला केला. तेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यापीठाच्या आवारात जाऊन काही क्षण तेथे ‘मौन’ उभी राहिली. तिने भाषण केले नाही, पण दीपिकाचे मौन हा संस्कार व शिक्षणाचा प्रभाव होता, पण त्यानंतर दीपिकावर झालेले असभ्य हल्ले, तिच्या चित्रपटांवरील बहिष्कार हे अज्ञान, अंधकारात देश चाचपडत असल्याचे लक्षण होते. आता देशाच्या शहाणपणावर प्रश्न निर्माण केल्याने अभिनेत्री काजोलही असभ्य, अज्ञानी लोकांच्या निशाण्यावर आली. या देशात सध्या शिक्षणावर बोलण्याची सोय राहिलेली नाही. धर्माचा गांजा ओढून शिक्षितही अंधभक्त बनले आहेत. त्यावर उपाय काय? काजोलने अंधभक्तांच्या डोळ्यांत ज्ञानाचे काजळ घातले खरे, पण तरीही भक्त आंधळेच राहिले!”, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

Story img Loader