नवी मुंबईत पोलीस प्रशासनाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपा नेत्यांवर घणाघाती टीका केली. “देशाचे गृहमंत्री तडीपार होते, जो तडीपार होईल तो उद्या मंत्री होईल एवढं लक्षात ठेवा”, असं वक्तव्य करत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीबीआयचे खटले दाखल आहेत. त्यामुळे पहिले मुख्यमंत्र्यांना तडीपार करा, अशीही मागणी सावंत यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी करा,मुंबई हायकोर्टात आज सुनावणी
“विस्तवाला हात लावू नका, मनात विस्तव आहे आणि हातात मशाल. तुम्ही जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा यावेळी सावंत यांनी विरोधकांना दिला. कोकण दौऱ्यावरुन परतल्यानंतर सावंत यांनी राणे कुटुंबियांवरदेखील हल्ला चढवला. “कोकणातल्या कुटुंबात सर्वच सुक्ष्म आहेत. सुक्ष्म म्हटल्यावर अधिक बारकाई असा अर्थ होतो. पण सुचतच नाही अशा माणसाला. ही माणसं शिवसेनेला नेस्तुनाबूत करणार का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. पक्षातून बाहेर पडल्यानंतर राणेंनी राजकारणात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केला, असा टोलाही सावंत यांनी यावेळी लगावला.
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला धक्का, ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’ होणार
“पहिल्यांदा फुटून स्वाभिमान पक्ष काढला. त्यानंतर मुलाला गहाण ठेवून ते काँग्रेसमध्ये गेले. काही दिवसांनंतर मुलगा काँग्रेसमध्ये आला. मग काँग्रेस सोडताना सांगितलं या हातावर रक्ताचे डाग आहेत. त्यानंतर अचानक गुजरातमध्ये अमित शाहांना भेटले”, असे सांगत नारायण राणेंच्या पक्षांतरावरून सावंत यांनी सडकून टीका केली.