शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनी अलीकडेच एका तरुणाला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. ही घटना ताजी असताना आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांना मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. याप्रकरणी नितीन देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीन देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी पोलिसांना मारहाण किंवा धक्काबुक्की केली असेल तर आमदारकीचा राजीनामा देईन, असं नितीन देशमुखांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीन देशमुखांनी हे विधान केलं. यावेळी देशमुख म्हणाले, “मी दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य पदावर काम केलं आहे. ३५३ कलमाचा पोलिसांकडून कसा गैरवापर केला जातो, हे मला माहीत आहे. निश्चितपणे आम्ही पोलिसांचा आदर व सन्मान करतो. पण आम्ही साध्या अधिकाऱ्यासोबत कशाला वाद घालू… आमदाराचा वाद मुख्य सचिव किंवा मोठ्या अधिकाऱ्यांसोबत झाला, तर तो साहजिकच आहे. पण हे बिचारे तिथे ड्युटी करतात. त्यांच्याशी आम्ही कशाला वाद घालू…”

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

हेही वाचा- ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून पोलिसांना मारहाण, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

“पण मुळात विरोधी पक्षनेते किंवा मंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी परवानगी कशाला हवी? मुंबईतही अधिवेशन भरतं. पण येथे मंत्री किंवा विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावर जाण्यासाठी कसल्याही प्रकारची परवानगी किंवा पासेस मागितले जात नाहीत. पण नागपुरात आमच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावर जाण्यापासून आडवलं जातं. आम्ही आमच्या पक्ष प्रमुखांच्या बैठकीला चाललो असताना ते आम्हाला कसं काय आडवू शकतात. तिथे जो हा गैरप्रकार सुरू होता, याला आम्ही विरोध केला.

हेही वाचा- अनिल देशमुखांच्या सुटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM मोदी आणि शाह यांना…”

तुम्ही पोलिसांना मारहाण केली का? असं विचारलं असता नितीन देशमुख म्हणाले, “मी जर पोलिसांना मारहाण किंवा धक्काबुक्की केली असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. नाहीतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एका आमदाराला न्याय द्यावा आणि त्या पोलिसाला निलंबित करावं,” अशी मागणी नितीन देशमुखांनी यावेळी केली.

Story img Loader