‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राज्यात राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला आहे. या खोचक टीकेला आमदार आणि ठाकरे गटातील नेते सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आदित्य ठाकरे यांचा बाप आहे हे लवकरच यांना दिसून येईल”, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
“छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते…”, आदित्य ठाकरेंना अब्दुल सत्तारांचा खोचक टोला!
“महाराष्ट्रात आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाला शिंदे-फडणवीसांचे युती सरकार घाबरलं आहे”, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, “मी त्यांच्यासोबत बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांना जे त्यांनी विचारलं ते मी करत नसल्यानं त्यांना वाईट वाटलं आहे” असे प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी सत्तारांना दिले आहे. पीक पाहणी दौऱ्यादरम्यान अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला होता. यावरुन ठाकरेंनी सत्तारांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
‘टाटा एअरबस’ निर्मिती प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. यावर बोलताना अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला आहे. “या व्यवहारात त्यांच्याशी देवाण-घेवाण बरोबर झाली नाही का? यावरही लोक प्रश्न विचारू लागले आहेत. छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते जर आधी बोलले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती”, असे सत्तार म्हणाले आहेत.
टाटा एयरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचे उद्योग मंत्र्यांवर टीकास्र; म्हणाले, “मग इतके महिने…”
“तो प्रकल्प कधी गेला? कसा गेला? कोणती तारीख होती? हे जर बारकाईनं त्यांनी पाहिलं तर त्यांच्या सगळं लक्षात येईल. २१ सप्टेंबर २०२१ ला हा प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. जे बोलत आहेत, ते तेव्हा कॅबिनेट मंत्री होते”, अशी टीका अब्दुल सत्तारांनी केली आहे.