रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे पडसाद शिवसेना ठाकरे गटात उमटू लागले आहेत. रत्नागिरी विधानसभेत गद्दारी करणाऱ्या लोकांचा पाढा वाचल्यावर ठाकरे गटाचे पदाधिकारी एकमेकांना चांगलेच भिडले. हा प्रकार माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरीमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी एकमेकांना भिडल्याने रत्नागिरीत हा चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये जिल्हा प्रमुख विलास चाळके यांना टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. याप्रकारानंतर जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले.

former MLA ratnagiri Rajan Salvi subhash bane Ganpat Kadam
राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन आमदार…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
MNS chief Raj Thackeray is upset with local level intr party dispute three day Nashik tour ended in one and a half days
पक्षांतर्गत मतभेदामुळे नाराज राज ठाकरे मुंबईला परत, दीड दिवसातच नाशिक दौरा आटोपता
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे सध्या तडफडत आहेत कारण… किरीट सोमय्यांनी थेट…
Raj Thackeray upset factionalism MNS nashik
मनसेतील गटबाजीने राज ठाकरे नाराज; जिल्हा, शहर कार्यकारिणी बरखास्तीची शक्यता
Shiv Sena Thackeray factions Ratnagiri taluka chief Bandya Salvi resigns
रत्नागिरीत राजकीय घडामोडीना वेग; शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचा राजीनामा

आणखी वाचा- Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचं उद्धव ठाकरे, शरद पवारांना निमंत्रण; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सगळ्यांनी…”

राज्यातील विधानसभा निवडणूक संपल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यांनी रत्नागिरी शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विषय मांडत असताना एका पदाधिकाऱ्याने गद्दारी कोणी कोणी केल्याचे सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर वादाची ठीणगी पडली. या वादामध्ये जिल्हा प्रमुख विलास चाळके यांना टार्गेट करण्यात येऊन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सगळा प्रकार माजी खासदार विनायक राऊत यांच्या समोर घडल्याने त्यांनी हा विषय आवरता घेतला. यावेळी माजी आमदार बाळ माने हे सुद्धा उपस्थित होते. शिवसेना कार्यालयात घडलेल्या प्रकाराबद्दल पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-सत्तास्थापनेनंतर पहिला कोणता निर्णय होणार? लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत केसरकरांचं मोठं वक्तव्य; महिलांना गोड बातमी मिळणार?

यासर्व प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदिप साळवी यांनी आपण आपल्या राजीनामा देत असल्याचे सांगितले. नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे तालुकाप्रमुख साळवी यांनी स्पष्ट केले. शिवसेना कार्यालयात झालेल्या या राड्यानंतर जिल्हाप्रमुख विलास चाळके ही राजीनामा देण्याच्या तयारीत असून घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Story img Loader