राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार ठरविण्यात अपयश आल्याची टीका सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली होती. या टीकेला आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू द्या, आम्ही आमचं काम करत असतो, असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवारांच्या या विधानावर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “विधानसभा अध्यक्ष जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत…”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान; सुप्रीम कोर्टाबाबतही मांडली भूमिका!

Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा…
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi : सोलापूरमध्ये भर सभेत पोलिसांनी दिली नोटीस; असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “त्यांचं जावयावर खूप प्रेम, आय लव्ह…”
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Radhakrishna Vikhe Patil Said This Thing About Rahul Gandhi
Radhakrishna Vikhe Patil : “राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जायचा प्रस्ताव..” राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
Megharani Jadhav
“धनुष्यबाणाला मत दिलं नाही तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची ‘लाडक्या बहिणीं’ना तंबी
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

काय म्हणाले विनायक राऊत?

खासदार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. दरम्यान, यावेळी त्यांना शरद पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, “सामनातील अग्रलेख खासदार संजय राऊत लिहितात. राजकारण आणि समाजकारण याचा गाढा अभ्यास असलेले संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच ते त्यांचे विचार ‘सामना’तून मांडत असतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच “सामनातील अग्रलेख कोणी गांभीर्याने घेवो अथवा न घेवो. मात्र, माध्यमांची रोजच्या दिवसाची सुरुवात ‘सामना’च्या अग्रलेखानेच होते, हे सुद्धा नाकारता येत नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसमध्ये स्थान काय?”, शरद पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

शरद पवार काय म्हणाले होते?

दरम्यान, शरद पवारांनी आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सामनातील अग्रेलखातून करण्यात आलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. “सामनातील अग्रलेखाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू दे. आम्ही आमचं काम करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काय करतो, हे त्यांना माहिती नसतं. मात्र, आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक असतं”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “मविआत कुणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये”, ‘त्या’ विधानावरून छगन भुजबळांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला; म्हणाले, “जोपर्यंत…”

‘सामना’मध्ये नेमकं काय म्हटलं होतं?

“शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. मात्र, पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यामुळेच निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला”, अशी टीका सामनातून करण्यात आली होती.