समाजवादी संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीत ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचं आता समाजवादी संघटनाशी मनोमिलन झाले असल्याची चर्चा आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. या टीकांवर ठाकरे गटाने आता सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. “समाजवादी हे धर्मनिरपेक्ष, तरीही वाजपेयींच्या सरकारात ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपाचे ‘हिंदुत्व’ मिलावटीराम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे”, असा सल्लाही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

हे त्यांचे राजकीय वैफल्य

मुख्यमंत्री शिंदे हे काही दिवसांचेच पाहुणे आहेत असा सर्वोच्च न्यायालयाचाच निवाडा आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद जसे बेकायदा आहे तसे त्यांचे हिंदुत्वदेखील ढोंगी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ढोंगांतर’ करून जे हिंदुत्व स्वीकारले ते बेगडी आहे. शिंदे आता म्हणतात, उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री आणखी बरेच काही बरळले. ते त्यांचे राजकीय वैफल्य आहे. ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय, असा दिव्य संदेश शिंदे यांच्या मिंध्या डोक्याने दिला, अशी टीका यातून करण्यात आली आहे.

Aditya Thackeray criticizes Amit Shah,
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ‘काँग्रेसनेही बाबासाहेबांचा अपमान केला’ विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, “दुसऱ्याने शेण खाल्लं…”
Sanjay Shirsat on Sharad Pawar
Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis Rahul Narwekar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीस, राहुल नार्वेकरांची भेट; सुनील प्रभूंनी सांगितलं नेमकी चर्चा काय झाली?
Shambhuraj Desai On Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून शंभुराज देसाई यांचं आव्हान; म्हणाले, “त्यांची नावं सांगा, मग आम्ही…”
Uddhav Thackeray Maharashtra Cabinet Expansion Mahayuti
Uddhav Thackeray : महायुतीमधील नाराज नेते तुमच्या संपर्कात आहेत का? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, “मला त्यांचे निरोप…”
Shivsena UBT Sanjay Raut Allegation PM Modi
DY Chandrachud : “धनंजय चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल व्हायला हवा”, ठाकरे गटाचे गंभीर आरोप; मोदींवरही टीकास्र

हेही वाचा >> विघ्नसंतोषी लोकांना आपण हरवू शकतो- उद्धव ठाकरे

पाकड्या खेळाडूंवर फुलांचा वर्षाव, हेच तुमचे मिंधे छाप हिंदुत्त्व?

“हिंदुत्वाचे ‘मिलावटराम’ असा उल्लेख त्यांनी केला. यानिमित्ताने त्यांना राम आठवला हे बरे झाले. अन्नात भेसळ करणाऱ्यांना जर हे महाशय मिलावटराम म्हणत असतील तर ज्यांनी तुमच्या ताटात आतापर्यंत सुग्रास जेवण वाढले ते जेवण ओरपून बेइमानी करणाऱ्यांना ‘नमकहराम’ म्हटले पाहिजे. आता या नमकहरामांचे हिंदुत्व किती पुचाट आहे ते पहा. अहमदाबादेत ‘वर्ल्ड कप’ क्रिकेटचे सामने सुरू आहेत. तेथे पाकिस्तानचा संघ उतरला तेव्हा अहमदाबाद विमानतळापासून ते नरेंद मोदी स्टेडियमपर्यंत पाकडय़ांच्या स्वागतासाठी भाजपने म्हणजे ‘मोदी-शहा’ सरकारने लाल गालिचे अंथरले व पाकड्या खेळाडूंवर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. हेच काय तुमचे ‘मिंधे’छाप हिंदुत्व? यावर मिंधे म्हणतात, ”खेळ व धर्माची गल्लत करू नका.” वा! हे कोणी सांगावे, तर ज्यांनी इमान आणि सत्ता यांची गल्लत केली आहे त्यांनी? मुळात असे सांगणे हा मिलावटी हिंदुत्वाचा प्रकार तर आहेच, पण नमकहरामीचे टोक आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे हिंदुत्व नसून नामर्दानगीच

पाकिस्तान व हिंदुत्वाचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कठोर होती. “जोपर्यंत कश्मिरातील हिंदूंचा रक्तपात थांबत नाही तोपर्यंत पाकड्यांचे पाय माझ्या देशात पडू देणार नाही”, या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचा मिंध्यांना विसर पडलेला दिसतो. पाकड्यांचे स्वागत करणे, कश्मिरात पंडित व जवान मारले जात असताना तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसणे हे हिंदुत्व नसून नामर्दानगीच आहे. मुख्यमंत्रीपदी बसलेल्या मिंध्यांना आता मोदी-शहांच्या नामस्मरणाचे व्यसन जडले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण स्वतःस शिवसेना समजणाऱ्या या लोकांनी आपली प्रतिष्ठा भाजपचरणी ठेवून गुलामगिरी पत्करल्याचे जाहीर केले आहे.

शिवसेना व समाजवादी विचारांच्या मंडळींचे मनोमीलन झाल्याबद्दल मिंधे गटाच्या दाढीला आग लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना हे पटले नसते वगैरे मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. शिवसेना व समाजवादी एकत्र आले हे भाजपास पटलेले दिसत नाही. म्हणून मुख्यमंत्री मिरच्या झोंबल्याप्रमाणे तडतडत आहेत, असा हल्लाबोलही ठाकरे गटाने केला आहे.

समाजवाद्यांनी आपापल्या घरावर तिरंगे फडकवून स्वातंत्र्याचे स्वागत केले

एक मात्र नक्की, संघ परिवाराप्रमाणे समाजवादी ढोंगी किंवा दुटप्पी नाहीत. त्यांच्या कारवाया गुप्त नसतात. समाजवादी व शिवसेनेतील वाद उघड आहेत. पंचवीस वर्षे मैत्रीचे नाटक करून पाठीत खंजीर खुपसण्याचे कृत्य समाजवाद्यांनी केले नाही. महाराष्ट्र व राष्ट्र जाती-धर्माच्या नावाने पेटवून फोडण्याचे कारस्थान त्यांनी रचलेले नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात समाजवादी उघडपणे सहभागी होते व देश स्वतंत्र झाल्यावर समाजवाद्यांनी आपापल्या घरावर तिरंगे फडकवून स्वातंत्र्याचे स्वागत केले. इंदिरा गांधी हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत, त्यामुळे देशाच्या लोकशाहीस धोका आहे याची खात्री पटताच समाजवादी विचारांचे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालीच समग्र क्रांतीचा, दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा झाला व सर्व समाजवादी मंडळी त्यात सहभागी झाली होती. म्हणूनच देशात परिवर्तन झाले, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

मिंध्यांनी पक्षांतर केले आणि ढोंगांतरही

गोवा मुक्ती संग्रामात संघ कोठेच नव्हता, पण राममनोहर लोहिया, मधू दंडवते, मधू लिमये हे समाजवादी पोर्तुगीजांशी लढण्यात आघाडीवर होते. आणीबाणीविरोधात समाजवादी जॉर्ज फर्नांडिस यांनी तर सशस्त्र लढ्याची उभारणी केली व त्याचा फायदा भाजपाने घेतला. समाजवादी हे धर्मनिरपेक्ष, तरीही वाजपेयींच्या सरकारात ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपाचे ‘हिंदुत्व’ मिलावटीराम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे. इतिहासाची पाने चाळली तर त्यांच्या अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ हा त्यांचा प्रकार राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे. मिंध्यांनी पक्षांतर केले व ढोंगांतरही केले. त्यातून निर्माण झालेला ‘माजवाद’ जनता कायमचा गाडेल!, अशी टीकाही या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Story img Loader