शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निवडणूक आयोगाकडे बनावट कागदपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
हेही वाचा : ‘आमचं चिन्ह…’, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…!
“शिल्लक सेना शिल्लक ठेवण्यासाठी ही पातळी गाठता?? निवडणूक आयोगाकडे बनावट प्रतिज्ञापत्र सादर करता??….अरे, बाळासाहेबांच्या प्रतिमेची तरी लाज बाळगा रे….”असं नरेश म्हस्के यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. या ट्वीटसोबत त्यांनी ठाण्यातील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याची एक एफआयआरची प्रतही जोडली आहे.
हेही वाचा : “ कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास…”; अंबादास दानवेंची शिंदे गटावर टीका
बनावट शपथपत्र तयार केल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत चार हजार ६८२ प्रतिज्ञापत्रे पोलिसांना सापडली आहेत. मुंबई पोलिसांनी अशीच कारवाई माहिम व अंधेरी येथेही केली आहे. आरोपींनी बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचा संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, याप्रकरणात कोणत्या राजकीय पक्षाच्या सहभागाबाबत पोलिसांकडून कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ –
बनावट शपथपत्रांप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; राजकीय पक्षाच्या सहभागाबाबत तपास सुरू
चुनाभट्टी येथील रहिवासी संजय कदम यांच्या तक्रारीवरून निर्मल नगर पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार वांद्रे न्यायालय परिसरातील एका कार्यालयात हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यांनी पक्षाच्या नोंदणीबाबत बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि पक्षाचे चिन्ह आपल्याकडे ठेवण्यासाठी ही बनावट शपथपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केल्याचा संशय आहे. मात्र, अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून, निर्मल नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
तले.