सांगली : सरकारच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यापेक्षा उध्दव ठाकरे यांनी करोना काळातील उपचार केंद्र, शव पेटी यातील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशीची मागणी करावी. ठाकरेंच्या काळात मृतांच्या टाळू वरचे लोणी खाल्ले अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी इस्लामपुरात केली.

ते म्हणाले, उध्दव ठाकरेंना आता घर बसल्या तुरळक काम शिल्लक आहे, ठाकरे यांच्या काळात फक्त फेसबुक लाईव्ह चालायचे, अडीच वर्षात कोणत्या रुग्णालयात ते गेले नाहीत. मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात आले नाहीत, कधी १२ कोटी जनतेचा विचार केला नाही. संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी आमचे प्रवक्ते नितेश राणे आहेत.

हेही वाचा >>> इस्लामपुरचा भावी आमदार भाजपचाच- बावनकुळे

राष्ट्रवादी पक्ष वाचवण्यासाठी का धडपड करावी लागते याचे शरद पवार, जयंत पाटील यांनी आत्मचिंतन करावे. एकतर्फी निर्णय आणि एक तर्फी पक्ष चालवणे याचे हे परिणाम आहेत. तेव्हाच सर्वांना सांभाळून घेतले असतं तर ही वेळ आली नसती असेही बावनकुळे म्हणाले.